हार्टअटॅक नव्हे या 'सायलेंट किलर' आजारामुळे झाले सुब्रत रॉय यांचे निधन
सहारा समूहाचे प्रमुख सुब्रत रॉय यांच्या निधनामुळे सहारा इंडिया परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सुब्रत रॉय दीर्घ काळापासून गंभीर आजाराचा सामना करत होते. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये त्यांनी मंगळवारी (14 नोव्हेंबर 2023) अखेरचा श्वास घेतला.
छातीत दुखू लागल्याने 12 नोव्हेंबरला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान कार्डिअॅक रेस्पिरेटरी अरेस्टची समस्या निर्माण झाल्याने डॉक्टर त्यांचा जीव वाचवू शकले नाहीत.
दीर्घ काळापासून मेटास्टॅटिक समस्येमुळेही सुब्रत रॉय त्रस्त होते. या आजारात कॅन्सरच्या पेशी ट्युमरपासून विभक्त होतात व रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करतात.
सुब्रत रॉय मधुमेह व हायपरटेंशन आजारानेही ग्रस्त होते. रक्तातील शर्करा व रक्तदाब वाढल्याने कित्येक गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो.
मधुमेह हा एक गंभीर आजार आहे. या आजारात योग्य प्रकारे आरोग्याची काळजी न घेतल्यास शरीर कमकुवत होऊ शकते. यामुळे किडनी, डोळे, फुफ्फुसे व मज्जासंस्थेवर दुष्परिणाम होतात.
हायपरटेंशनमुळे हृदयविकारांचा धोका वाढतो. कारण रक्तदाब कमी किंवा जास्त झाल्यास हृदयाकडून संपूर्ण शरीराला होणाऱ्या रक्तपुरवठ्यावर परिणाम होतात.