दिवाळी फराळासाठी तयार करा कुरकुरीत खमंग मक्याचा चिवडा, पाहा रेसिपी

| Published : Oct 27 2024, 10:58 AM IST

Makycha Chivada

सार

Makyacha Chivda Recipe : दिवाळीसाठी पोह्यांएवजी मक्याचा चिवडा तयार करणार असाल तर पाहूया संपूर्ण रेसिपी स्टेप बाय स्टेप सविस्तर…

Makyacha Chivda Recipe : दिवाळीसाठी फराळ तयार करताना वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. काहींच्या घरी पातळ पोह्यांचा तर काहींकडे मक्याचा चिवडा तयार केला जातो. यंदाच्या दिवाळीला खमंग आणि कुरकुरीत मक्याचा चिवडा तयार करू शकता. पाहूया रेसिपी सविस्तर…

साहित्य : 

  • 250 ग्रॅम मक्याचे फ्लेक्स
  • 150 ग्रॅम शेंगदाणे
  • 150 ग्रॅम सुकं खोबऱ्याचे पातळ काप
  • 50 ग्रॅम पंढरपूर डाळ
  • 50 ग्रॅम काजूचे तुकडे
  • 25 ग्रॅम बेदाणे
  • 3 हिरव्या मिरच्या
  • कढीपत्ता
  • 1/2 टेबलस्पून तिखट लाल मिरची पावडर
  • 1 टेबलस्पून कश्मीरी मिरची पावडर
  • 1 टीस्पून हळद
  • 1/4 टीस्पून हिंग
  • 1 टेबलस्पून अख्खे धने (भाजून)
  • 1 टेबलस्पून बडीशेप (भाजून)
  • 1 टेबलस्पून चाट मसाला
  • 1.5 टेबलस्पून मीठ
  • 1 टेबलस्पून आमचूर पावडर
  • 1/2 टेबलस्पून चाट मसाला

कृती : 

  • सर्वप्रथम धणे आणि बडीशेपसह अन्य सुक्या मसाले मिक्सरमध्ये वाटून घ्या.
  • गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये अर्धी वाटी तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर शेंगदाणे, सुके खोबरे, पंढरपूर डाळ आणि काजू भाजून घ्या.
  • दुसऱ्या कढईत दोन वाट्या तेल घालून त्यामध्ये कॉर्न फ्लेस तळून घ्या. तळलेले कॉर्न फ्लेस थंड होण्यासाठी एका ताटात काढून ठेवा.
  • कढईमध्ये पुन्हा तेल घालून फोडणीसाठी मिरची, कढीपत्ता तळून घ्या. आता तळलेले कॉर्न फ्लेस, वाटलेले मसाले एकत्रित करा आणि थोडावेळ भाजून घ्या. चवीनुसार मीठ आणि साखरही घाला.
  • दिवाळीसाठी तयार केलेला खमंग असा मक्याचा चिवडा एका झाकणबंद डब्यात भरुन ठेवा आणि पाहुणे आल्यानंतर खाण्यासाठी सर्व्ह करा.

VIDEO : पाहा खमंग अशी मक्याच्या चिवड्याची संपूर्ण रेसिपी 

View post on Instagram
 

 

आणखी वाचा : 

कच्च्या केळ्याच्या 7 रेसिपी, पिझ्झा-बर्गर खाणेही विसराल

पाहुण्यांसाठी तयार करा Moong Dal Halwa, पाहा स्टेप बाय स्टेप रेसिपी