- Home
- lifestyle
- Chanakya Niti : गुढीपाडव्याला या ठिकाणी चुकूनही जाऊ नका, कमावलेला मान-सन्मान एका क्षणात जाईल!
Chanakya Niti : गुढीपाडव्याला या ठिकाणी चुकूनही जाऊ नका, कमावलेला मान-सन्मान एका क्षणात जाईल!
Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतीशास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. विशेषतः, आपला आदर आणि सन्मान जपण्यासाठी माणसाने कोणत्या ठिकाणी कधीही जाऊ नये, हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. गुढीपाडव्यानिमित्त जाणून घ्या…
14

Image Credit : chat gpt
चाणक्य नीती
आचार्य चाणक्य हे भारतातील एक महान विद्वान, अर्थशास्त्रज्ञ आणि रणनीतीकार होते. त्यांनी लिहिलेल्या नीतीशास्त्रामध्ये मानवी जीवनाशी संबंधित अनेक पैलू आहेत. चाणक्य यांनी अशा काही ठिकाणांबद्दल सांगितले आहे, जिथे माणसाने राहणे टाळावे. कारण या ठिकाणी राहिल्यास आयुष्याची दिशा बदलते आणि असलेला आदर पूर्णपणे नाहीसा होतो.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source

24
Image Credit : Getty
त्या ठिकाणी कधीही पाऊल ठेवू नका
माणसाने आयुष्यात आपल्या आत्मसन्मानाला सर्वाधिक महत्त्व दिले पाहिजे. व्यक्ती आयुष्यभर कष्ट करून मान-सन्मान कमावते. अपमान आणि अनादर यामुळे व्यक्तीचा सन्मान कमी होतो. याचा परिणाम त्याच्या आत्मविश्वासावरही होतो. त्यामुळे, जिथे तुम्हाला मान-सन्मान मिळणार नाही, असं वाटतं, त्या ठिकाणी कधीही पाऊल ठेवू नका.
34
Image Credit : Getty
अशा ठिकाणी कधीही राहू नये
माणसाला जगण्यासाठी योग्य कामाची गरज असते. त्या कामातूनच त्याला उत्पन्न मिळते. जिथे रोजगाराची संधी नाही किंवा कमाईचे कोणतेही साधन नाही, अशा ठिकाणी कधीही राहू नये. तिथे राहिल्यास केवळ आर्थिक अडचणीच येत नाहीत, तर आयुष्य नरकासारखं होऊन जातं.
44
Image Credit : Getty
शिक्षण हे माणसासाठी खूप महत्त्वाचे
संकटकाळात कुटुंब, नातेवाईक, मित्र आणि जवळची माणसंच आपल्याला मदत करतात. त्यामुळे, जिथे तुमची ओळख नाही किंवा मदतीला कोणीही धावून येणार नाही, अशा ठिकाणी कधीही राहू नका. अशा ठिकाणी संकट आल्यास ते नरकासारखं वाटतं. तसेच, जिथे शिक्षण आणि ज्ञान मिळवण्याची सोय नाही, तिथेही राहू नये, कारण शिक्षण हे माणसासाठी खूप महत्त्वाचे आहे.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

