सार
यंदा मकर संक्रातीचा सण 15 जानेवारीला साजरा केला जाणार आहे. संक्रातीच्या सणानिमित्त तिळगुळ आवर्जुन तयार केले जातात. पण यंदाच्या मकर संक्रातीला पौष्टिक अशी तिळाची बर्फी नक्की तयार करून पाहा.
Makar Sankranti Special Recipe : मकर संक्रातीचा सण आणि हिवाळ्याच्या दिवसात तिळ आणि गुळाचा वापर करून वेगवेगळ्या रेसिपी तयार केल्या जातात. तिळगुळ प्रत्येकालाच आवडतो. पण यंदाच्या मकर संक्रातीच्या सणानिमित्त खास तिळाची बर्फी नक्की तयार करून पाहा. जाणून घेऊया तिळाची बर्फी तयार करण्यासाठी लागणारे सामग्री आणि कृती याबद्दल सविस्तर....
सामग्री
- एक कप तीळ
- एक कप गूळ
- दोन चमचे तूप
- एक चतुर्थांश चमचा वेलची पावडर
- ड्राय फ्रुट्स
कृती
- एक पॅन घेत तो मंद आचेवर गॅसवर ठेवून त्यामध्ये तीळ हलक्या तपकिरी रंगाचे होईपर्यंत भाजा. यावेळी तीळ पॅनला चिकटले जाणार नाहीत याची काळजी घ्या.
- तीळ भाजून झाल्यानंतर ते पॅनमधून काढून एका वाटीत ठेवा. आता त्याच पॅनमध्ये गूळ मंद आचेवर गरम करा. गुळाचा पाक तयार होईपर्यंत तो विरघळू द्या.
- गुळाचा पाक तयार झाल्यानंतर त्यामध्ये भाजलेले तीळ त्यामध्ये मिक्स करा. या दोन्ही गोष्टी व्यवस्थितीत एकजीव होईपर्यंत मिश्रण ढवळत राहा.
- पॅनमधील बर्फीच्या मिश्रणात तूप आणि वेलची पावडर मिक्स करून घ्या. बर्फीचे मिश्रण पुन्हा व्यवस्थितीत ढवळा आणि गॅस बंद करा.
- आता एक प्लेट घेऊन त्याला थोड तूप लावा. तिळाच्या बर्फीसाठी तयार करण्यात आलेले मिश्रण प्लेटमध्ये काढा.
- प्लेटमध्ये बर्फीचे मिश्रम व्यवस्थितीत सेट केल्यानंतर गार्निशिंगसाठी बारीक चिरलेले ड्रायफ्रुट्स टाका. मिश्रण थोडं थंड झाल्यानंतर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तिळाची बर्फी कापून घ्या.
- लक्षात ठेवा तिळाच्या बर्फीचे मिश्रण घराच्या तापमानानुसार पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्याचे तुकडे कापून एका घट्ट डब्यात भरून ठेवा.
यंदाच्या मकर संक्रातीच्या सणानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांना तिळगुळासह तिळाची बर्फीही नक्कीच खायला द्या.
आणखी वाचा:
Cauliflower Manchurian Recipe : घरच्याघरी बनवा रेस्टॉरंटसारखे चविष्ट फ्लॉवर मंच्युरिअन
Caramel Tea Recipe : घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास तयार करा कॅरेमल टी , वाचा संपूर्ण रेसिपी
Year Ender 2023 : यंदाच्या वर्षात व्हायरल झाले हे Bizarre Foods