Author: Chanda Mandavkar Image Credits:social media
Marathi
ओरिओ पकोडा
सोशल मीडियावर ओरिओ बिस्किटाच्या भजीचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला. ओरिओ पकोड्याची काहींनी कौतुक केले असले तरीही हे फूड विचित्रच आहे.
Image credits: social media
Marathi
व्हेनिला पाणी पुरी
काहीतरी हटके करायचे म्हणून यंदाच्या वर्षात व्हेनिला पाणी पुरी खूप व्हायरल झाली. या पाणीपुरीत बटाटा किंवा वाटाण्याच्या रगड्याऐवजी व्हेनिला आइस्क्रिम टाकून सर्व्ह केली गेली.
Image credits: social media
Marathi
टोमॅटो आइस्क्रिम
टोमॅटो आइस्क्रिम रोल हे फूड देखील यंदाच्या वर्षात चर्चेत राहिले. तुम्ही टोमॅटोच्या वेगवेगळ्या रेसिपी खाल्ल्या असतील. पण टोमॅटो आइस्क्रिम हे फूड तर खवय्यांना न पचण्यासारखेच आहे.
Image credits: social media
Marathi
रम चहा
ग्रीन टी, ब्लॅक टी सोडून यंदा रम चहा देखील खूप व्हायरल झाला. खरंतर अल्कोहोलयुक्त असलेली रम ही चहासाठी वापर करणे कित्येक जणांना न पटण्यासारखे आहे.
Image credits: social media
Marathi
सफरचंद इडली
पारंपारिक पांढऱ्या रंगाची मऊ इडली खाणे सर्वांना आवडते. पण तुम्ही सफरचंद इडली यंदाच्या वर्षात खाल्ली का? खरंतर सफरचंद इडलीही या वर्षातील विचित्र फूडपैकी एक आहे.
Image credits: social media
Marathi
फळांची चहा
यंदाच्या वर्षात फळांपासून तयार करण्यात आलेली चहा खूप व्हायरल झाली. या चहामध्ये केळ, चिकू, सफरचंद सारख्या फळांचा वापर करण्यात आला होता.
Image credits: social media
Marathi
डेअरी मिल्क ऑम्लेट
यंदाच्या वर्षात दिल्लीतील ऑम्लेट तयार करणाऱ्या एका काकांचा व्हिडिओ सोशल मीडियात खूप व्हायरल झाला. त्यांची डेअरी मिल्क ऑम्लेटची रेसिपी प्रसिद्ध झाली. पण ही एक विचित्रच रेसिपी आहे.