Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीनिमित्त मित्रपरिवार, नातेवाईकांना मेसेज, WhatsApp Message पाठवून द्या सणाच्या खास शुभेच्छा

| Published : Jan 11 2024, 05:33 PM IST / Updated: Jan 11 2024, 06:49 PM IST

Makar Sankranti 2024
Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीनिमित्त मित्रपरिवार, नातेवाईकांना मेसेज, WhatsApp Message पाठवून द्या सणाच्या खास शुभेच्छा
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

येत्या 15 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण सर्वत्र साजरा केला जाणार आहे. यंदाच्या मकर संक्रांतीनिमित्त तुमच्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना सणाचे खास मेसेज पाठवून शुभेच्छा देऊ शकता. 

’तिळगूळ घ्या गोड-गोड बोला' हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांती या सणाला विशेष महत्त्व आहे. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. या क्षणाला मकर संक्रमण असे म्हणतात. सूर्याच्या मकर संक्रमणावर आधारित असलेला हा एक भारतीय सण आहे. यंदा मकर संक्रांत 15 जानेवारीला साजरी करण्यात येणार आहे.

या सणानिमित्ताने तीर्थस्नान आणि दान करण्याची परंपरा आहे. या दिवशी प्रत्येक घरामध्ये गोड पदार्थ तयार केले जातात. पतंग उडवण्याच्या निमित्ताने नातेवाईक, कुटुंबीय आणि मित्रपरिवार एकत्र येतात. या दिवशी आपण आपल्या जवळच्या लोकांना खास मराठीतून संदेश सणाच्या शुभेच्छा नक्की द्या.

  • मनामध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण 
    तुम्हा सर्वांची आपुलकी म्हणजे गुळाचा गोडवाच जणू उडवू
    आपण एकत्र पतंग आणि आकाशात भरू नात्याचे रंग
    मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! Happy Makar Sankranti 2024
     
  •  मनातील स्वप्न घेऊन पतंग उडवणार आकाशात इतका उंच उंच उडो
     तुमच्या स्वप्नांचा पतंग की जीवनात घेऊन येईल सुख-आनंदाचे तरंग
     मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
     
  • यंदाची मकर संक्रांत तुमच्यासाठी असो तिळाच्या लाडूसारखी गोड
     पतंगासारखे उंच उडणारे तुम्हाला मिळो यश
     तुम्ही सदैव राहा आनंदी
     याच आमच्या सदिच्छा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
     
  • उंच पतंग आणि मोकळे आकाश 
    संक्रांतीच्या निमित्ताने सर्वत्र पसरो हर्षोल्हास
     मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
     
  • पतंगाहूनही मोठी असो तुमच्या यशाचे उड्डाण
     तुमचे जीवन होवो गुळापेक्षाही गोड
     Happy Makar Sankranti 2024
     
  • कोणीही कापू शकणार नाही तुमचा पतंग 
    कमकुवत होऊ नये विश्वासाचा धागा जीवनातील सर्व यश मिळो
     तुम्हाला जसे पतंग उंच उडतो
     आकाशात मकर संक्रांतीच्या शुभेच्छा 2024!
     
  • सुंदर-सुंदर फुलांनी बहरो तुमचे अंगण
     तुम्हाला कधीही करावा न लागो काट्यांचा सामना
     तुमच्या जीवनात असो केवळ सुख-आनंद
     याच मकर संक्रांतीच्या शुभेच्छा !
     
  • मकर संक्रांतीचा हा सण
    तुमच्या जीवनात घेऊन येवो 
    सुख, समाधान, आनंद, समृद्धीचे क्षण
     मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
     
  • तिळाएवढे असावे दुःख गुळासारखे गोड-गोड असावे
    आनंदाचे क्षण तीळगुळासारखे असावे जीवन 
    मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
     
  • गुळाच्या गोडीप्रमाणे नात्यात आणा गोडवा
     मनातील रुसवे फुगवे बोलून सोडवा
     मनाने मनाची नाती जोडा 
    मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

(DISCLAIMER :लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

Year 2024वर असणार शनिचा प्रभाव, जाणून घ्या अंकशास्रातील 24 क्रमांकाचे महत्त्व

Makar Sankranti : मकर संक्रांतीच्या सणावेळी चुकूनही करू नका ही कामे

Makar Sankranti 2024 : वर्षभरात किती वेळा साजरी केली जाते संक्रांती?