मकर संक्रांतीच्या सणावेळी चुकूनही करू नका ही कामे
मकर संक्रांतीचा सण हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. यंदा मकर संक्रांती येत्या 15 जानेवारीला साजरी केली जाणार आहे. या दिवशी पुढील काही कामे करणे टाळा.
मकर संक्रांतीच्या दिवशी दानाचे फार महत्त्व आहे. यामुळे संक्रांतीच्या दिवशी एखाद्याने तुमच्याकडे भोजनाची इच्छा व्यक्त केल्यास त्याला रिकाम्या पोटी पाठवू नका.
मकर संक्रांतीच्या दिवशी एखाद्याचे मन दुखवू नका. याशिवाय एखाद्यासाठी अपशब्दांचा वापरही करू नका.
मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी अल्कोहोलचे सेवन करू नये. याशिवाय अन्य मादक पदार्थांपासूनही दूर रहावे.
ग्रंथांनुसार, मकर संक्रांतीच्या सणाला फार महत्त्व आहे. या सणापासून देव-देवतांचा दिवस सुरू होतो असे मानले जाते. यामुळे मकर संक्रांतीला नॉन-व्हेज पदार्थ खाणे टाळावे.
मकर संक्रांतीच्या सणावेळी पूजा करावी. याशिवाय तन आणि मनाने ब्रम्हचार्याचे पालन करावे. ग्रंथांमध्येही या दिवशी ब्रम्हचार्याचे पालन करण्याबद्दल सांगितले आहे.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.