Marathi

Makar Sankranti 2024

वर्षभरात किती वेळा साजरी केली जाते संक्रांती?

Marathi

मकर संक्रांती

सर्वसामान्यपणे मकर संक्रांतीचा सण जानेवारी महिन्यात साजरा केला जातो. पण तुम्हाला माहितेय का, वर्षभरात किती संक्रांती येतात? जाणून घेऊया याबद्दल अधिक...

Image credits: Getty
Marathi

संक्रांती म्हणजे काय?

सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्याच्या स्थितीला ‘संक्रांती’ म्हटले जाते. सूर्य प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या राशींमध्ये प्रवेश करत असल्याने वर्षभरात 12 संक्रांती येतात.

Image credits: Getty
Marathi

संक्रांतीचे महत्त्व

धर्मग्रंथांमध्ये संक्रांती साजरी करण्याचा उल्लेख आहे. यामुळे सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत गेल्यानंतर एखाद्या पवित्र नदीत स्नान करून गरजूंना अन्नधान्य, कपडे यांचे दान करावे.

Image credits: Getty
Marathi

उत्तरायण

ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, ज्यावेळी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा तो उत्तर गोलार्धाच्या दिशने गती करू लागतो. याला उत्तरायण म्हटले जाते. उत्तरायणला देव-देवतांचा दिवसही मानतात. 

Image credits: Getty
Marathi

मकर संक्रांतीचे वैज्ञानिक महत्त्व

सूर्याचे उत्तरायण सुरू झाल्यानंतर दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागते. ही स्थिती शेती, पाऊस आणि अन्य कामांसाठी उत्तम मानली जाते. यामुळेच मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो.

Image credits: Getty
Marathi

मकर संक्रांतीचा सण कधी?

दरवर्षी मकर संक्रांतीचा सण 14 जानेवारीला साजरा केला जातो. यंदा सूर्य 15 जानेवारीला आलेल्या सोमवारी सकाळी मकर राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे संक्रांतीचा सण 15 जानेवारीला असणार आहे. 

Image credits: social media
Marathi

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image Credits: Getty