सार
हिंदू धर्मात महाशिवरात्री प्रमुख उत्सवांपैकी एक आहे. या दिवशी भगवान शंकरासह देवी पार्वतीची पूजा केली जाते. महाशिवरात्रीला शिवभक्त उपवास करण्यासह मोठ्या भक्तीभावाने पूजा-प्रार्थनाही करतात.
Maha Shivratri 2024 : महाशिवरात्रीला हिंदू धर्मात फार मोठे महत्त्व आहे. या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वती यांची पूजा केली जाते. खरंतर, भगवान शंकरांचा सर्वाधिक मोठा उत्सव महाशिवरात्रीनिमित्त देशभरात पाहायला मिळतो. यंदा महाशिवरात्री फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला म्हणजेच 8 मार्चला साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान शंकराच्या मंदिराला सजावट करण्यासह विशेष अनुष्ठानही केले जाते.
महाकालेश्वर, केदारनाथ, सोमनाथ, काशी विश्वनाथ, देवघर या ठिकाणांसह जगभरातील सर्व शंकरांच्या मंदिरांना सजावट केली जाते. शिवलिंगावर जल, दूध, दही, मध आणि तूप अर्पण केले जाते. याशिवाय भगवान शंकराला प्रिय असणाऱ्या गोष्टीही अर्पण केल्या जातात. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो.
महाशिवरात्रीनिमित्त करण्यात येणाऱ्या पूजा-प्रार्थनेसंदर्भात पुढील काही माहिती असाव्यात...
- महाशिवरात्रीच्या दिवशी कठोर उपवास केला जातो. या दिवशी केवळ फळ आणि दूधाचे सेवन केले जाते. अन्न आणि पाण्याचा त्याग केला जातो. असे मानले जाते की, उपवास केल्याने भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळतो. याशिवाय मन आणि तन शुद्ध होते.
- शिवभक्त मंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा करतात. शिवलिंगाला जल, दूध, मध, तूप अर्पण करत स्नान घातले जाते. याशिवाय शंकराला प्रिय असणाऱ्या गोष्टीही अर्पण केल्या जातात.
- शिवलिंगावर अभिषेक केला जातो. यामुळे शंकराचे आशीर्वाद मिळतात असे शिवभक्तांचे मानणे आहेत
- शिवभक्त महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण रात्रभर शंकराची पूजा-प्रार्थना करतात. शिवनामाचा जप आणि भजन गातात. असे मानले जाते की, संपूर्ण रात्र भगवान शंकराची पूजा-प्रार्थना केल्याने शंकर प्रसन्न होतात आणि त्यांच्या दिव्य शक्तीचा तुम्हाला अनुभव येतो.
- काही शिवभक्त महाशिवरात्रीनिमित्त हवन करतात. यावेळी शंकराला समर्पित असणाऱ्या मंत्रांचा जाप केला जातो.
- महाशिवरात्रीनिमित्त योगाभ्यास आणि मेडिटेशन करणे उत्तम मानले जाते. यामुळे तुमचे अंतरमन आणि आध्यात्मिक शक्ती जागृत होऊ शकते.
- महाशिवरात्रीनिमित्त शंकराचे आशीर्वाद मिळण्यासाठी शिवभक्त महाकालेश्वर, केदारनाथ, सोमनाथ आणि काशी विश्वनाथ, देवघरसह काही प्रसिद्ध मंदिरांमध्ये दर्शनासाठी जातात.
- महाशिवरात्री दिवशी बहुतांश ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
- महाशिवरात्रीनिमित्त आध्यामिक उन्नतीसाठी एक पवित्र वेळ असते. याशिवाय गरजूंना, भुकेलेल्यांना अन्नदान करणे, दान करणे शुभ मानले जाते.
आणखी वाचा :
ज्योतिर्लिंग आणि शिवलिंगमधील फरक काय?
महाशिवरात्रीनिमित्त भगवान शंकराला अर्पण करा या गोष्टी
होळी दहन, होळी आणि चंद्रग्रहण, जाणून घ्या मार्च 2024 मध्ये कधी आणि काय होणार?