Marathi

Festival

महाशिवरात्रीनिमित्त भगवान शंकराला अर्पण करा या गोष्टी

Marathi

यंदा महाशिवरात्री कधी?

यंदा महाशिवरात्री 8 मार्च, 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान शंकराला प्रिय असणाऱ्या काही गोष्टी अर्पण केल्या जातात. जेणेकरुन तुमच्या आयुष्यातील समस्या दूर होतात.

Image credits: adobe stock
Marathi

रुईचे फूल

शंकराला रुईचे फूल अत्यंत प्रिय आहे. शिवपुराणानुसार, शंकराला लाल-पांढऱ्या रंगातील रुईचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो असे म्हटले जाते.

Image credits: wikipedia
Marathi

बेलाचे पान

शंकराची पूजा करताना बेलाचे पान नक्की अर्पण करा. अन्यथा तुमची पूजा पूर्ण होत नाही असे मानले जाते. बेलाचे पान अर्पण करताना ते फाटलेले नसावे.

Image credits: adobe stock
Marathi

धोत्रा

शंकराची पूजा करताना धोत्रा वनस्पती अर्पण करावी. शिवपुराणानुसार, शंकराला धोत्रा अर्पण केल्याने पुत्र प्राप्त होण्याचे भाग्य लाभते.

Image credits: adobe stock
Marathi

जल अर्पण करा

महाशिवरात्रीनिमित्त शंकराला सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर एका तांब्यात शुद्ध जल अर्पण करा. यामुळे शंकराचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात.

Image credits: adobe stock
Marathi

भांग

शंकराला भांगचा नैवेद्य खासकरुन अर्पण केला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराला भांग अर्पण केल्यास तुमच्या इच्छा लवकर पूर्ण होतात.

Image credits: adobe stock
Marathi

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image Credits: Getty