MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Lucky Birth Dates : या तारखांना जन्मलेले लोक पैशांच्या बाबतीत असतात खूप लकी, बक्कळ पैसा कमवतात!

Lucky Birth Dates : या तारखांना जन्मलेले लोक पैशांच्या बाबतीत असतात खूप लकी, बक्कळ पैसा कमवतात!

अंकशास्त्रानुसार तुमची जन्मतारीख फक्त तुमचा स्वभावच नाही, तर पैशांच्या बाबतीत तुमचं नशीबही ठरवते. काही विशिष्ट तारखांना जन्मलेल्या लोकांना आर्थिक बाबतीत खूप चांगल्या संधी मिळतात. हे लोक आपल्या हुशारीने बक्कळ पैसा कमवतात.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Sep 21 2026, 01:15 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
जन्मतारखेनुसार तुमचं नशीब
Image Credit : Asianet News

जन्मतारखेनुसार तुमचं नशीब

अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेचा माणसाच्या आयुष्यावर चांगला आणि वाईट दोन्ही प्रभाव पडतो. काही विशिष्ट तारखांना जन्मलेल्या लोकांना पैशांच्या बाबतीत खूप चांगल्या संधी मिळतात. हे लोक पैसे कमवण्याच्या बाबतीत खूप हुशार असतात. आयुष्यात लवकर सेटल होण्याची त्यांची शक्यता जास्त असते. पैशांच्या बाबतीत कोणत्या तारखांना जन्मलेले लोक लकी असतात, ते आपण इथे जाणून घेणार आहोत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
मूलांक १
Image Credit : chatgpt

मूलांक १

कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ किंवा २८ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक १ असतो. अंकशास्त्र सांगतं की, या लोकांमध्ये नेतृत्वाचे गुण ठासून भरलेले असतात. हे लोक स्वतःचे निर्णय स्वतः घेतात. नवीन गोष्टी करून पाहायला ते कधीच घाबरत नाहीत. नोकरीसोबतच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार त्यांच्या डोक्यात नेहमी असतो. पैशांच्या बाबतीत ते एक ध्येय ठरवतात आणि त्यासाठी खूप मेहनत घेतात. म्हणूनच हे लोक आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत असतात.

Related Articles

Related image1
Chanakya Niti : नवरा गरीब असला तरी चालेल, पण चाणक्यांनी सांगितलेले हे ५ गुण त्याच्यात नक्की बघा!
Related image2
Vastu Tips : घराच्या मुख्य दरवाजावर कोणत्या देवाचा फोटो लावावा? चुकीमुळे होऊ शकतं नुकसान
35
मूलांक २
Image Credit : Getty

मूलांक २

कोणत्याही महिन्याच्या २, ११, २० किंवा २९ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक २ असतो. या तारखांना जन्मलेले लोक खूप भावुक असतात, पण त्यांची विचार करण्याची क्षमताही उत्तम असते. हे लोक घाईघाईने निर्णय घेत नाहीत, तर परिस्थिती समजून घेऊनच पुढचं पाऊल टाकतात. पैसा कुठे खर्च करायचा आणि कुठे वाचवायचा, याबद्दल ते खूप सावध असतात. इतरांसोबत मिळून काम करणं आणि पार्टनरशिपमध्ये संधी शोधणं त्यांच्यासाठी खूप फायद्याचं ठरतं.

45
मूलांक ३
Image Credit : chatgpt

मूलांक ३

कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१ किंवा ३० तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ३ असतो. या लोकांमध्ये खूप क्रिएटिव्हिटी असते. नेहमीच्या मार्गावरून न जाता, काहीतरी वेगळा विचार करून नवीन संधी शोधण्याची त्यांची सवय असते. मीडिया, कला, संवाद, शिक्षण आणि व्यवसाय यांसारख्या क्षेत्रात हे लोक भरपूर पैसा कमवतात. त्यांनी आपल्या टॅलेंटचा योग्य वापर केला, तर ते खूप मोठी आर्थिक प्रगती करू शकतात, असं अंकशास्त्र सांगतं.

55
मूलांक ५
Image Credit : chatgpt

मूलांक ५

कोणत्याही महिन्याच्या ५, १४ किंवा २३ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ५ असतो. न्यूमरोलॉजीनुसार, हे लोक बदल खूप लवकर स्वीकारतात. नवीन संधी चालून आल्यावर ते लगेच त्याचा अभ्यास करतात आणि पुढे जातात. व्यवसाय, मार्केटिंग, कम्युनिकेशन आणि ट्रॅव्हलिंगशी संबंधित क्षेत्रात हे लोक खूप ॲक्टिव्ह असतात. उत्पन्नाच्या एकाच मार्गावर अवलंबून न राहता, नवीन मार्ग शोधणं ही त्यांची खासियत असते. याच सवयीमुळे ते बक्कळ पैसा कमवतात.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Lunch Bag Cleaning : तुमच्या लंच बॅगला घाण वास येतोय? स्वच्छ करण्यासाठी या सुपर ट्रिक्स वापरा
Recommended image2
Vitamin D Deficiency : शरीरात व्हिटॅमिन डी कमी झाल्यावर दिसतात ही 6 लक्षणं, अजिबात दुर्लक्ष करू नका
Recommended image3
Blood Sugar : गोड खाण्यापेक्षा अपूर्ण झोपेमुळे शुगर जास्त वाढते का? तज्ज्ञ काय सांगतात
Recommended image4
Navratri 2026 Day 1 : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी द्या शैलपुत्री मातेच्या खास शुभेच्छा
Recommended image5
Weekly Horoscope : या आठवड्यात 4 राशींना मिळणार बक्कळ यश; 11 ते 17 ऑक्टोबरचे 12 राशींचे भविष्य
Related Stories
Recommended image1
Chanakya Niti : नवरा गरीब असला तरी चालेल, पण चाणक्यांनी सांगितलेले हे ५ गुण त्याच्यात नक्की बघा!
Recommended image2
Vastu Tips : घराच्या मुख्य दरवाजावर कोणत्या देवाचा फोटो लावावा? चुकीमुळे होऊ शकतं नुकसान
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved