MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Kitchen Tips : मेथीची भाजी निवडण्याची सोपी ट्रिक, कमी वेळात होईल काम

Kitchen Tips : मेथीची भाजी निवडण्याची सोपी ट्रिक, कमी वेळात होईल काम

Kitchen Hacks : हिवाळ्यात मेथी, पालक यासारख्या पालेभाज्यांची आवक मोठी असते. पण पालेभाज्या निवडण्याचा कित्येकांना कंटाळा येतो. या लेखाद्वारे जाणून घेऊया मेथीची भाजी झटपट निवडण्याची सोपी ट्रिक…  

2 Min read
Author : Chanda Mandavkar
| Updated : May 06 2025, 02:12 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
झटपट निवडा मेथीची भाजी
Image Credit : Getty

झटपट निवडा मेथीची भाजी

Methi Leaves Cleaning Tips : मेथीचा पराठा, मेथीची पुरी अथवा मेथीच्या भाजीचे नाव काढले की तोंडाला पाणी सुटते. मेथीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे गुणधर्म असतात, ज्यामुळे यकृताचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. याशिवाय मधुमेहाच्या रुग्णांसाठीही ही भाजी फायदेशीर आहे. 

यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. खरंतर मेथी खाणे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे. पण ही भाजी निवडण्यासाठी बराच वेळ लागतो. पण मेथी निवडण्याची सोपी पद्धत तुम्हाला कळली तर? जाणून घेऊया याबाबतच सविस्तर माहिती… 

25
VIDEO : मेथीची पाने निवडण्याची सोपी ट्रिक
Image Credit : Masterchef Pankaj Instagram

VIDEO : मेथीची पाने निवडण्याची सोपी ट्रिक

मास्टरशेफ पंकज भदौरिया (Masterchef Pankaj Bhadouria) यांनी नुकत्याच आपल्या  इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये पंकज यांनी पुरी तळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या झाऱ्याच्या मदतीने मेथीची भाजी निवडण्याची सोपी ट्रिक सांगितली आहे. झारा एका हातात पकडावा व त्यावरील छिंद्रामध्ये मेथीच्या भाजीचे देठ घालावे व खालील बाजूने देठ खेचावे. ही पद्धत वापरल्यास अगदी कमी वेळामध्ये मेथीची भाजी निवडून होईल. (Methichi Bhaji Swacha Kashi Karychi Tips)

Related Articles

Related image1
घरी आलेल्या पाहुण्यांना उन्हाळ्यात प्यायला द्या हे 5 रिफ्रेशिंग ड्रिंक
Related image2
सकाळचा थकवा होईल दूर, करा या 7 फूड्सचे सेवन
35
व्हिडीओ व्हायरल
Image Credit : Mastechef Pankaj Instagram

व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर मास्टरशेफ पंकज यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओला 15 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.  पंकज यांनी मेथी निवडण्याची दाखवलेली ही ट्रिक अतिशय उपयुक्त असल्याची प्रतिक्रिया युजर्संनी दिली आहे.

45
मेथी पुरी रेसिपी
Image Credit : Masterchef Pankaj Instagram

मेथी पुरी रेसिपी

साहित्य:

  • गव्हाचे पीठ - दोन कप
  • चिरलेली मेथी - एक कप
  • जीरे - एक चमचा
  • तिखट मसाला - एक चमचा
  • हळद - अर्धा चमचा
  •  गरम मसाला - अर्धा चमचा 
  • मीठ - चवीनुसार 
  • तळण्यासाठी तेल 
  • आवश्यकतेनुसार पाणी
55
कृती:
Image Credit : Getty

कृती:

  • एका भांड्यात गव्हाचे पीठ, बारिक चिरलेली मेथी, जीरे, तिखट मसाला, हळद, गरम मसाला आणि मीठ सर्व सामग्री एकत्रित करा.
  •  मेथीच्या पानांना पाणी सुटते, त्यामुळे पाणी कमी प्रमाणातच वापरावे व पीठ घट्ट मळून घ्या. पीठ मळून झाल्यानंतर त्यावर 10-15 मिनिटे झाकण ठेवावे. 
  • पिठाचे लहान-लहान गोळे तयार करा. यानंतर पराठा लाटून घ्यावा. 
  • कढईत मंद आचेवर तळण्यासाठी तेल गरम करा. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पुरी अलगद सोडावी. दोन्ही बाजूने पुरी व्यवस्थित तळून घ्या. 
  • तळलेल्या पुऱ्या एका प्लेटमध्ये काढा. गरमागरम मेथी पुरीचा दही, लोणचे अथवा आवडीच्या चटणीसोबत आस्वाद घ्या.
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by MasterChef Pankaj Bhadouria (@masterchefpankajbhadouria)

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.

Recommended Stories
Recommended image1
Gold Double Chain: ऑफिस वेअरला ग्लॅम टच हवाय? मग या गोल्ड डबल चेन आहेत परफेक्ट
Recommended image2
Collar Kurti: वाइड लेग जीन्सवर स्टाईल करा कॉटनचे शॉर्ट कुर्ते, पाहा 7 बेस्ट डिझाइन्स
Recommended image3
Foldable iPhone: ॲपलचा पहिला फोल्डेबल आयफोन येतोय! किंमत आणि फीचर्स पाहून व्हाल थक्क
Recommended image4
Sankashti Chaturthi : विकट संकष्टी चतुर्थीची ही कथा वाचल्याशिवाय व्रत अपूर्ण, जाणून घ्या संपूर्ण कहाणी
Recommended image5
Jewellery: इकत साडीची शान वाढवणारे हे गोल्ड लेयर्ड नेकलेस बघितलेत का?
Related Stories
Recommended image1
घरी आलेल्या पाहुण्यांना उन्हाळ्यात प्यायला द्या हे 5 रिफ्रेशिंग ड्रिंक
Recommended image2
सकाळचा थकवा होईल दूर, करा या 7 फूड्सचे सेवन
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved