सार

Fruit Flies: घरात आणलेल्या फळांवर माशा घोंघावण्याच्या समस्येमुळे त्रस्त आहात? यापासून दूर राहण्यासाठी काही घरगुती उपाय करू शकता. याचबद्दल जाणून घेऊयात सविस्तर...

Fruit Flies Home Remedies: स्वयंपाकघरात स्वच्छता न ठेवल्यास दुर्गंधी येऊ लागते. काहीवेळेस अस्वच्छतेमुळे माशा देखील घरात येतात. याच माशा घरातील फळ आणि भाज्यांवर घोंघावत राहतात. यामागील कारण म्हणजे फळांचा वास. फळांच्या वासाकडे माशा आकर्षित होतात. फळं किंवा भाज्या कुजल्या किंवा खराब झाल्या असतील तर अधिकच माशा त्यावर घोंघावू लागतात. माशांना कितीही दूर करण्याचा प्रयत्न केला तरी त्या पुन्हा त्यावर येऊन बसतात. 

तुमच्या घरात सुद्धा फळांवर माशा घोंघावत राहतात? फळांवर घोंघावणाऱ्या माशांचा रंग हा वेगवेगळा असू शकतो. या माशा पिकलेल्या, ओलसर आणि सडलेल्या फळांच्या आसपास फिरत राहतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी उपाय शोधताय? जाणून घ्या याबद्दल अधिक...

अ‍ॅपल साइडर व्हिनेगर

अ‍ॅपल साइडर व्हिनेगर त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असते. घरातील स्वच्छतेसाठी तुम्ही अ‍ॅपल साइडर व्हिनेगरचा वापर करू शकता. कारण यामध्ये अ‍ॅसिड असते. फळं, भाज्यांवरील माशा दूर करण्यासाठी अ‍ॅप्पल साइडर व्हिनेगरचा स्प्रे तयार करू शकता.

  • एका स्प्रे बॉटलमध्ये अ‍ॅपल साइडर व्हिनेगर आणि भांड्यांचा साबण मिक्स करा
  • बॉटलमधील मिश्रण व्यवस्थितीत मिक्स करा
  • फळ आणि भाज्यांवर तयार करण्यात आलेले लिक्विड स्प्रे करा

दुसरा उपाय म्हणजे तुम्ही घरच्या घरी फ्रुट फ्लाय ट्रॅप तयार करू शकता. यासाठी व्हिनेगरचा वापर करू शकता.

  • फ्रुट फ्लाय ट्रॅपसाठी व्हिनेगर आणि पिकलेल्या फळाचा एक तुकडा घ्या
  • एका बरणीत थोडेसे व्हिनेगर आणि पिकलेल्या फळाचा तुकडा टाका
  • बरणीत पेपरचा शंकू तयार करून ठेवा
  • पिकलेल्या फळाचा तुकडा आणि व्हिनेगरच्या वासाने फळांवर येणाऱ्या माशा दूर होतील

 या टिप्सही वाचा
किचनमध्ये फळांवर अधिकच माशा घोंघावत असल्यास पुढील काही उपाय करू शकता.

  • शिळे अन्नपदार्थ उघड्यावर ठेवू नका
  • अन्नपदार्थ कचऱ्याच्या डब्यात टाका
  • फळ आणि भाज्या फ्रिजमध्ये ठेवा
  • स्वयंपाकघरात कचरा करू नका
  • अधिक पिकलेली फळं टाकून द्या

याशिवाय घरात पूजेसाठी लागणाऱ्या कापूरचा वापरही फळांवरील माशा दूर करण्यासाठी करू शकता. कापूरचा वासाने किडे-मुंग्या दूर जातात. यासाठी कापूरचा तुकडा घेऊन तो फळांचा बास्केट अथवा कचरा डब्याजवळ ठेवा. अथवा कापूरची पूड तयार करून ती घरात स्प्रे करू शकता.

आणखी वाचा: 

Nail Care: सुंदर नखांसाठी हा 5 प्रकारचा पौष्टिक आहार ठरेल फायदेशीर

सॉफ्ट ड्रिंक-दारूमुळे वर्षाला तब्बल 1 कोटी लोकांचा होतोय मृत्यू, WHOने केले मोठे विधान

Skin Care : तुमची त्वचा पिवळसर झालीय? असू शकते हे गंभीर कारण, जाणून घ्या उपाय