सार
कलौंजीच्या तेलामध्ये भरपूर पोषण तत्त्वे असतात. यामुळे हृदयाचे आरोग्य राखण्यासह अन्य काही समस्याही दूर होण्यास मदत होते. जाणून घेऊया कलौंजीचा कशाप्रकारे वापर करावा आणि फायदे सविस्तर...
Kalonji Oil Benefits : अनहेल्दी लाइफस्टाइल आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे बहुतांशजणांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढणे ते हृदयासंबंधित समस्या उद्भवल्याचे दिसून येते. यापासून आराम मिळण्यासाठी औषधीय गुणांनी समृद्ध असणाऱ्या कलौंजीच्या तेलाचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते. या तेलामध्ये थाइमोक्विनोन नावाचे तत्त्व, अँटीऑक्सिडेंट्स, अँटी-अॅलर्जीक, अँटी फंगल, अँटी-इंफ्लेमेंटरी असे गुण असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. जाणून घेऊया कलौंजीच्या तेलाचे फायदे सविस्तर आणि कशाप्रकारे वापर करावा.
हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
औषधीय गुणांनी समृद्ध असणाऱ्या कलौंजीच्या तेलामध्ये भरपूर पोषण तत्त्वे असतात. यामुळे हृदयाचे आरोग्य राखले जाते. याचा वापर केल्याने आरोग्याला फायदा होता. कलौंजीच्या तेलामुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी होण्यास मदत होते.
असा करा वापर
सकाळ-संध्याकाळ एक चमचा कलौंजीच्या तेलाचे सेवन करा. याशिवाय एक ग्लास दूधामध्ये एक चमचा कलौंजीच्या तेलाचे सेवन करू शकता. यामुळे हृदयाचे आरोग्य राखण्यासह शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होईल. सूज कमी होणे, ब्लड शुगर नियंत्रणात राहणे, केस आणि त्वचेलाही याचा फायदा होईल.
हृदयाच्या आरोग्यासाठी फायदे
कोलेस्ट्रॉल कमी होतो
कलौंच्या तेलामध्ये अँटी-इंफ्लेमेंटरी गुण असतात. याचे सेवन केल्याने शरीरात गुड कोलेस्ट्रॉल म्हणजेच एचडीएल (HDL)चा स्तर उत्तम होतो आणि बॅड कोलेस्ट्रॉल (LDL) चा स्तर कमी होण्यास मदत होते. यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी कलौंजीच्या तेलाचे सेवन करू शकता.
हृदयाचे आरोग्य
कलौंजीमधील अँटी-इंफ्लेमेंटरी गुणांमुळे याचे सेवन करणे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. धमन्यांमध्ये प्लाक जमा होण्याचा धोका कमी होणे आणि ब्लड फ्लो उत्तम होण्यास मदत होते. यामुळे हृदय हेल्दी राहते.
ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते
कलौंजीच्या तेलाची पोषण तत्त्वांमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी होतो. याशिवाय ब्लड फ्लो उत्तम राहत ब्लड प्रेशरचा स्तर कमी होण्यास मदत होतो.
ब्लड सर्कुलेशन उत्तम होते
कलौंजीच्या तेलामुळे कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी होऊन धनम्या उघडण्यास मदत होते. यामुळे शरीरात ब्लड सर्कुलेशन व्यवस्थितीत होते.
सूज कमी होते
बहुतांशजणांना सूज येण्याची समस्या येते. अशातच कलौंजीच्या तेलाच सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. यामध्ये असणाऱ्या अँटी-इंफ्लेमेंटरी गुणांमुळे शरीर आणि हृदयाला येणारी सूज कमी होण्यास मदत होते.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)