सार

हेल्दी राहण्यासाठी बहुतांशजण एक्सरसाइज करण्याएवजी वॉक देखील करतात. पण ज्या वेळात तुम्ही वॉक करता त्याचा खरंच आरोग्यावर प्रभाव पडतो का? जाणून घेऊया वॉक करण्याची योग वेळ, फायदे आणि नुकसान याबद्दल सविस्तर...

Best time for walk during summer : वजन कमी करणे किंवा फिट राहण्यासाठी एक्सरसाइजची सुरुवात वॉकपासून केली जाते. सकाळी किंवा संध्याकाळच्या वातावरणात वॉक करणे महिला आणि पुरुषांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. तर प्रत्येक ऋतूत वॉक करण्यासाठी योग्य वेळ निवडणे अत्यंत महत्वाचे आहे. अन्यथा आरोग्याचे नुकसान होऊ शकते. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.

उन्हाळ्यात वॉक करण्याची योग्य वेळ

सकाळी वॉक करण्याची वेळ

वॉक करण्यासाठी उत्तम वेळ म्हणजे सुर्योदय होण्यावेळची आहे. यानंतर सकाळी 8 वाजेपर्यंत वॉक करू शकता. खरंतर, सुर्योदयानंतर वॉक केल्याने हवेतील प्रदुषाचा स्तर हळूहळू वाढत जातो. यामुळे सकाळी कोवळ्या उन्हात वॉक करण्यासाठी जाऊ शकता. यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी देखील मिळण्यास मदत होऊ शकते. याचा हाडांना फायदा होतो. (Walk for fitness)

 

संध्याकाळी वॉक करण्याची वेळ

ज्या व्यक्तींना सकाळएवजी संध्याकाळी वॉक करण्यास आवडते त्यांनी 4 वाजल्यानंतर आणि 6-8 दरम्यान वॉक करावे. यावेळी हवेत थंडावा येऊ लागतो आणि प्रदुषणाचा स्तर कमी झालेला असतो. सर्वाधिक खास गोष्ट अशी की, संध्याकाळी 4-7 वाजल्यादरम्यान स्नायू अधिक लवचीक होतात. अशातच वॉक करणे सोपे होऊ शकते. यामुळे आरोग्यालाही फायदा होईल.

चुकीच्या वेळी वॉक करण्याचे नुकसान

-पहाटे किंवा सकाळी लवकर काळोखात वॉक करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. कारण हवेत प्रदूषणाचा स्तर अधिक असतो. यामुळे अस्थमा, खोकला आणि सर्दीसारखी समस्या वाढली जाऊ शकते.

-सकाळच्या थंड हवेत वॉक केल्याने फुफ्फुसांवर ताण पडला जाऊ शकतो. यामुळे छाती फुलणे किंवा दुखणे अशी समस्या उद्भवू शकते.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)