कढीपत्ता दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी खास ट्रिक

| Published : Jan 15 2025, 09:32 AM IST

Curry Leaves

सार

कढीपत्ता दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक्स वापरल्या जातात. पण फ्रिजशिवाय कढीपत्ता महिनाभर किंवा त्याहून अधिक काळ टिकून राहण्यासाठी काय करावे याबद्दलच्या काही खास ट्रिक्स जाणून घेऊया.

Curry leaves store tips : कढीपत्त्याच्या वापर भाजीला किंवा वरणाला फोडणी देण्यासाठी केला जातो. यामुळे पदार्थाची चव वाढली जाते. पण कढीपत्ता दीर्घकाळ टिकवून कसा ठेवायचा असा प्रश्नही बहुतांश गृहिणींना पडतो. सर्वसामान्यपणे मार्केटमधून कढीपत्ता खरेदी केल्यानंतर आपण फ्रिजमध्ये स्टोर करतो. जेणेकरुन दीर्घकाळ टिकला जाईल. तरीही कढीपत्ता काही दिवसानंतर खराब होतो. अशातच फ्रिजशिवाय कढीपत्ता दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी कोणत्या ट्रिक्स फॉलो कराव्यात याबद्दल पुढे जाणून घेऊया.

तेलाचा वापर

महिन्याभरापेक्षा अधिक काळ कढीपत्ता टिकून राहण्यासाठी तेलाचा वापर करा. यासाठी कढीपत्ता स्वच्छ धुवून सुकवा. यानंतर तेलामध्ये कढीपत्ता तळून घ्या. तळलेला कढीपत्ता थंड झाल्यानंतर एका झाकणबंद डब्यामध्ये भरुन ठेवा.

कढीपत्त्याची पावडर तयार करा

कढीपत्ता आठवड्याभरापेक्षा अधिक काळ टिकत नसल्यास त्याची पावडर तयार करू शकता. यासाठी खूप प्रमाणात कढीपत्ता खरेदी करुन तो सुकवा. यानंतर कढीपत्ता मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची पूड तयार करा.

उन्हामध्ये सुकवा

कढीपत्ता उन्हामध्ये सुकवून 5-6 महिने वापरू शकता. यासाठी कढीपत्ता स्वच्छ धुतल्यानंतर सुकवा. कढीपत्त्याची पाने सुकत नसल्यास माइक्रोवेव्हची मदत घ्या. यावेळी कढीपत्त्याची पान माइक्रोव्हेवमध्ये जळणार नाही याची काळजी घ्या.

टिश्यू पेपरचा वापर

कढीपत्ता स्टोर करण्यासाठी झाकणबंद डब्याचा वापर करावा. यावेळी डब्यामध्ये टिश्यू पेपरचा वापर करा. यामध्ये कढीपत्ता गुंडाळून डब्यामध्ये ठेवा.

आणखी वाचा : 

Kitchen Tips : भाजीत अत्याधिक तेल पडलेय? या 5 टिप्स नक्की ट्राय करा

गॅस बर्नरवरील डाग स्वच्छ करण्यासाठी DIY Hacks, नक्की ट्राय करा