सार
पदार्थांमध्ये तेल अत्याधिक झाल्यास त्याची चवच नव्हे तर आरोग्यही बिघडले जाते. अशातच भाजीच्या ग्रेव्हीमधील तेल कमी करण्यासाठी काही खास टिप्स जाणून घेऊया.
Kitchen Tips : बहुतांशवेळा आपण एखादी भाजी आवडीने तयार करतो. पण त्यामध्ये कधी मीठ तर कधी तेल अधिक पडले जाते. अशातच भाजीमध्ये तेल अधिक झाल्यास ते ग्रेव्हीवर तरंगते. याशिवाय भाजीची चव आणि रंगही बदलला जातो. यामुळे भाजीसाठी केलेली सर्व मेहनत फुकट जाते. पण भाजीत अधिक झाल्यास काही ट्रिक्सने कमी करता येते. याबद्दलच पुढे सविस्तर जाणून घेऊया.
उकडलेले बटाटे
भाजीमध्ये तेल अधिक झाल्यास त्यामध्ये उकडलेले बटाटे स्मॅश करुन घाला. यासाठी उकडलेले बटाटे स्मॅश करुन पॅनमध्ये हलके भाजून घ्या आणि भाजीत मिक्स करा. कमीत कमी 5 मिनिटे भाजीमध्ये बटाटे शिजण्यास ठेवा आणि गॅस बंद करा. खरंतर, उकडलेल्या बटाट्यांमुळे भाजीमधील तेल कमी होण्यास मदत होते.
टोमॅटो प्युरी
भाजीमध्ये तेल अधिक झाल्यास ग्रेव्हीवर ते तरंगताना दिसते. यासाठी टोमॅटो प्युरीचा वापर करू शकता. टोमॅटो प्युरीमुळे भाजीची चव वाढण्यासह तेलही कमी होईल.
ब्रेड क्रम्ब्स
तर्री असणाऱ्या भाजीमध्ये तेल अधिक झाल्यास यामध्ये भाजलेले ब्रेड क्रम्ब्स मिक्स करू शकता. यासाठी ब्रेड क्रम्ब्स नॉन स्टिकमध्ये भाजून झाल्यानंतर भाजीमध्ये मिक्स करा. ब्रेड क्रम्ब्स भाजीमधील अत्याधिक तेल शोषून घेतील.
मक्याचे पीठ
ग्रेव्ही असणाऱ्या भाजीमध्ये तेल अधिक झाल्यास त्यामध्ये मक्याचे पीठ मिक्स करा. यासाठी मक्याच्या पीठात पाणी मिक्स करुन भाजीमध्ये घाला. यानंतर भाजी थोडावेळ पुन्हा शिजवत ठेवा. यामुळे भाजीमधील तेल कमी होण्यास मदत होईल.
बेसनाचे पीठ
बटाटा, वांग किंवा भेंडीच्या भाजीत गरजेपेक्षा अधिक तेल झाल्यास यामध्ये बेसनाचे पीठ मिक्स करा. यासाठी बेसनाचे पीठ थोड भाजून भाजीमध्ये घालाय. या ट्रिकनेही भाजीमधील तेल कमी होईल.
आणखी वाचा :
हिवाळ्यात टोमॅटो स्वस्त झालेत?, घरच्या घरी बनवा वर्षभर टिकणारी टोमॅटो प्युरी
गॅस बर्नरवरील डाग स्वच्छ करण्यासाठी DIY Hacks, नक्की ट्राय करा