जेवण तयार करताना त्याचे डाग गॅसवर पडले जातात किंवा एखादा पदार्थ सांडला जातो. अशातच गॅसचे बर्नर खराब होते. पण गॅसचे बर्नर स्वच्छ न केल्यास तेथे घाण जमा होऊ शकते.
गॅसच्या बर्नरवर दूध किंवा चहा पडल्यास लगेच स्वच्छ करा. जेणेकरुन डाग राहणार नाहीत.
गॅसरचा बर्नस स्वच्छ करण्यासाठी अल्कोहोलचा वापर करू शकता. चहा आणि दूधाचा डाग स्वच्छ करण्यासाठी अल्कोहोल बेस्ट ऑप्शन आहे.
गॅस बर्नर स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्याचा वापर करा. यामुळे बर्नरमध्ये अडकलेली घाण निघण्यास मदत होईल. पाण्यामध्ये लिक्विड डिशवॉशरही घाला.
बेकिंग सोडा आणि पाणी मिक्स करुन बर्नर स्वच्छ करू शकता.
व्हिनेगर आणि पाणी मिक्स करुन बर्नरवर स्प्रे करा. व्हिनेगरमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने बर्नर लगेच स्वच्छ आणि चमकदार होईल.
गॅस बर्नर स्वच्छ करण्यासाठी गरम पाणी आणि लिंबाचा रसाचा वापर करू शकता.