MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Gajakesari Rajyoga : गजकेसरी राजयोग उघडणार भाग्याचं दार! या ५ राशींवर होणार पैशांचा पाऊस

Gajakesari Rajyoga : गजकेसरी राजयोग उघडणार भाग्याचं दार! या ५ राशींवर होणार पैशांचा पाऊस

ज्योतिषशास्त्रात गजकेसरी राजयोग अत्यंत शुभ मानला जातो. गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे तयार होणाऱ्या या योगाचा कोणत्या ५ राशींना बंपर फायदा होणार आहे, ते आपण पाहूया.

3 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Sep 28 2026, 09:55 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
गजकेसरी राजयोगाचे फायदे
Image Credit : Asianet News

गजकेसरी राजयोगाचे फायदे

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मन आणि भावनांचा कारक आहे. चंद्र दर अडीच दिवसांनी राशी बदलतो. ऑक्टोबरच्या सुरुवातीला चंद्र कर्क राशीत प्रवेश करेल. तिथे आधीच उच्च स्थितीत असलेल्या गुरुसोबत चंद्राची युती होईल. यातूनच अत्यंत शुभ असा 'गजकेसरी राजयोग' तयार होत आहे.

यंदा पितृपक्ष २६ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान आहे. याच काळात हा योग जुळून येत आहे. दृक पंचांगानुसार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी संध्याकाळी ६:३१ वाजता चंद्र कर्क राशीत प्रवेश करेल आणि ६ ऑक्टोबरला रात्री १०:१७ वाजेपर्यंत तिथेच राहील. त्यानंतर तो सिंह राशीत जाईल. त्यामुळे ६ ऑक्टोबरपर्यंत या राजयोगाचा प्रभाव राहील. या गुरु-चंद्र युतीचा ५ राशींना मोठा फायदा होणार आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
मेष
Image Credit : Chatgpt

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी हा गजकेसरी राजयोग मालमत्ता आणि कौटुंबिक बाबतीत प्रगती घेऊन येईल. चौथ्या घरात गुरु आणि चंद्राची युती होत असल्याने घर, जमीन किंवा वाहन खरेदीचे तुमचे जुने स्वप्न पूर्ण होऊ शकते.

कुटुंबात आईची भक्कम साथ मिळेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. उच्च शिक्षण किंवा नोकरीत प्रमोशन मिळवण्याच्या प्रयत्नांना यश येईल. घरात शांतता राहील आणि तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. ऑफिसमधील जुने वाद संवादातून सुटतील.

Related Articles

Related image1
Vastu Tips For Money : कष्टाचा पैसा घरात टिकत नाहीये? मग घराचे हे कोपरे एकदा नक्की तपासा!
Related image2
Vastu Tips : फ्रिजवर फक्त या 3 गोष्टी ठेवून पाहा, रिकामे खिसे नक्की भरतील
36
वृषभ
Image Credit : Chatgpt

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास या राजयोगामुळे दुप्पट होईल. तिसऱ्या घरात गुरु-चंद्र एकत्र येत असल्याने नवीन कामे सुरू करण्याची तुमची इच्छा वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील किंवा अचानक नवीन संधी चालून येतील.

व्यावसायिकांना नवीन ग्राहक आणि मोठ्या करारांमधून चांगला नफा मिळेल. तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आता मार्गी लागतील. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. भावंडं आणि जवळच्या नातेवाईकांचीही तुम्हाला चांगली मदत मिळेल.

46
वृश्चिक
Image Credit : Chatgpt

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप भाग्यवान ठरणार आहे. नवव्या घरात या ग्रहांची युती होत असल्याने तुमच्या अनेक दिवसांच्या इच्छा पूर्ण होऊ लागतील. अध्यात्म आणि धार्मिक कार्यात तुमचा रस वाढेल. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठे यश मिळेल.

परदेशात शिक्षण किंवा नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी नवीन दरवाजे उघडतील. समाजात तुमचे नाव आणि कीर्ती वाढेल. काही महत्त्वाच्या लोकांशी तुमची ओळख होईल, ज्याचा भविष्यात तुम्हाला मोठा फायदा होईल. तुमची आर्थिक स्थितीही हळूहळू सुधारेल.

56
मकर
Image Credit : Chat gpt

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग करिअर आणि आर्थिक आघाडीवर मोठे बदल घडवून आणेल. सातव्या घरात गुरु आणि चंद्र एकत्र येत असल्याने नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी निर्माण होतील. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्यांना चांगली प्रगती पाहायला मिळेल. महत्त्वाच्या लोकांशी आलेला संपर्क तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी फायदेशीर ठरेल.

तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आता वेगाने पूर्ण होतील. वैयक्तिक आयुष्यातही आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनातील गैरसमज दूर होऊन जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल.

66
मीन
Image Credit : AI Image

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी गुरु-चंद्राची ही युती करिअर आणि पैशांच्या बाबतीत खूप फायदेशीर ठरेल. विशेषतः परदेशातील नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी शोधणाऱ्यांना मोठे यश मिळेल. करिअरमध्ये प्रगती होईल आणि समाजात तुमचा आदर वाढेल. कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल.

व्यावसायिकांना अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळेल. तुमचा खूप दिवसांपासून अडकलेला पैसा परत मिळण्याची दाट शक्यता आहे. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. पण, पैशांसोबतच तुम्ही आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. विनाकारण ताणतणाव घेणे टाळा आणि स्वतःला पुरेसा आराम द्या.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Joint Pain Relief : सांधेदुखी आणि हाडांच्या कमकुवतपणाने त्रस्त आहात? आहारात करा या ७ पदार्थांचा समावेश
Recommended image2
Vastu Tips For Money : कष्टाचा पैसा घरात टिकत नाहीये? मग घराचे हे कोपरे एकदा नक्की तपासा!
Recommended image3
Horoscope 28th September 2026 : स्वतःचं घर बांधण्याची शुभ वेळ आलीय! पाहा तुमची रास काय सांगतेय
Recommended image4
Rava Cake Recipe: ओव्हन, अंडी न वापरता फक्त ३० मिनिटांत बनवा मऊ आणि स्पॉंजी रवा केक
Recommended image5
Cooking Hacks : या 5 चुका केल्या तर तुमचा स्वयंपाक कधीच परफेक्ट होणार नाही
Related Stories
Recommended image1
Vastu Tips For Money : कष्टाचा पैसा घरात टिकत नाहीये? मग घराचे हे कोपरे एकदा नक्की तपासा!
Recommended image2
Vastu Tips : फ्रिजवर फक्त या 3 गोष्टी ठेवून पाहा, रिकामे खिसे नक्की भरतील
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved