MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • RO चं पाणी पिताय? सावधान! शरीरातील हाडं ठिसूळ आणि मिनरल्सची कमतरता होतेय का? वाचा डॉक्टरांचा काय आहे सल्ला

RO चं पाणी पिताय? सावधान! शरीरातील हाडं ठिसूळ आणि मिनरल्सची कमतरता होतेय का? वाचा डॉक्टरांचा काय आहे सल्ला

RO water health risks: RO वॉटर प्युरिफायर पाण्यातील अशुद्धीसोबतच कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखी आवश्यक खनिजेही काढून टाकतो, ज्यामुळे त्याच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली जाते. तथापि, तज्ज्ञांच्या मते, संतुलित आहारातून खनिजांची भरपाई होत आहे. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 10 2026, 04:00 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
18
RO चं पाणी पिताय? सावधान!
Image Credit : Getty

RO चं पाणी पिताय? सावधान!

मुंबई: आजकाल प्रत्येक घरात फ्रिज आणि गॅस शेगडीइतकाच RO (Reverse Osmosis) वॉटर प्युरिफायर हा महत्त्वाचा भाग बनला आहे. अशुद्ध पाणी, जंतू आणि जड धातू काढून टाकण्यासाठी आपण डोळे झाकून RO वर विश्वास ठेवतो. पण गेल्या काही काळापासून एक चर्चा जोरात सुरू आहे - RO चं पाणी शरीरासाठी घातक आहे का? यामुळे शरीरातील आवश्यक खनिजे (Minerals) नष्ट होतात का? तुमच्या मनातील या सर्व शंकांचे निरसन तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभ्यासातून खालीलप्रमाणे करण्यात आले आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
28
RO मुळे खरंच मिनरल्स कमी होतात का?
Image Credit : Getty

RO मुळे खरंच मिनरल्स कमी होतात का?

हो, हे खरं आहे. RO प्रक्रिया पाणी इतकं शुद्ध करते की, त्यात घातक अशुद्धीसोबतच शरीराला आवश्यक असलेले कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखे नैसर्गिक घटकही मोठ्या प्रमाणात गाळले जातात. यामुळे पाण्याची चव बदलते आणि ते 'अतिशुद्ध' झाल्याने आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असा एक समज आहे. 

Related Articles

Related image1
Home Decor : घर दिसेल राजवाड्यासारखं! लिव्हिंग रूमसाठी 10+ कॉपर-ब्रास शोपीस
Related image2
Money Management : पगार होताच या 5 गोष्टी करा, महिनाअखेर खिसा कधीच रिकामा होणार नाही!
38
पण घाबरण्याचं कारण नाही! का?
Image Credit : Getty

पण घाबरण्याचं कारण नाही! का?

प्रसिद्ध आहारतज्ज्ञ पलक नागपाल यांच्या मते, पाणी गाळताना मिनरल्स कमी होत असले, तरी त्याचा आरोग्यावर मोठा परिणाम होत नाही. याची ३ प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत. 

48
१. अन्नातून मिळते भरपाई
Image Credit : Getty

१. अन्नातून मिळते भरपाई

आपल्या शरीराला लागणाऱ्या एकूण खनिजांपैकी पाण्याचा वाटा खूप कमी असतो. आपल्याला खरी खनिजं आपण रोज खात असलेल्या अन्नातून मिळतात. जर तुमचा आहार संतुलित असेल, तर RO च्या पाण्याने कोणतीही कमतरता भासत नाही. 

58
२. किडनीवर परिणाम होतो का?
Image Credit : Getty

२. किडनीवर परिणाम होतो का?

नेफ्रोलॉजिस्ट डॉ. अनिश नंदा यांच्या मते, शरीरातील इलेक्ट्रोलाईट बॅलन्स राखण्याचं काम किडनी करते. आपण अन्नातून पोटॅशियम, सोडियम आणि कॅल्शियम घेतो, त्यामुळे फक्त RO चं पाणी पिल्याने किडनी निकामी होत नाही. उलट, दूषित पाण्यापेक्षा शुद्ध RO पाणी किडनीसाठी जास्त सुरक्षित आहे. 

68
३. इलेक्ट्रोलाईट बॅलन्स
Image Credit : Asianet News

३. इलेक्ट्रोलाईट बॅलन्स

निरोगी व्यक्तीच्या शरीरात संप्रेरके (Hormones) आणि किडनी खनिजांचे प्रमाण योग्य राखतात. त्यामुळे दीर्घकाळ RO पाणी पिल्याने लगेच अशक्तपणा येतो, हे म्हणणे चुकीचे आहे. 

78
मिनरल्सची कमतरता कशी भरून काढाल?
Image Credit : Gemini AI

मिनरल्सची कमतरता कशी भरून काढाल?

जर तुम्हाला वाटत असेल की RO मुळे पोषण कमी पडतंय, तर तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश करा.

कॅल्शियमसाठी: दूध, दही, पनीर, नाचणी, तीळ आणि बदाम.

मॅग्नेशियमसाठी: काजू, भोपळ्याच्या बिया, ओट्स, डाळी आणि पालेभाज्या.

पोटॅशियमसाठी: केळी, शहाळ्याचं पाणी (नारळ पाणी), रताळी आणि कडधान्ये. 

88
उपाय काय? 'री-मिनरलाईज्ड' वॉटर उत्तम की RO?
Image Credit : Getty

उपाय काय? 'री-मिनरलाईज्ड' वॉटर उत्तम की RO?

आजकाल बाजारात असे RO आले आहेत जे शुद्धीकरणानंतर पुन्हा त्यात आवश्यक मिनरल्स मिसळतात (Remineralisation).

जर तुमच्या भागातील पाणी खूपच 'हार्ड' असेल, तर RO वापरणे अनिवार्य आहे.

शक्य असल्यास 'मिनरल कार्ट्रिज' असलेला प्युरिफायर निवडा.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्युरिफायरची वेळेवर सर्व्हिसिंग करा.

RO चं पाणी 'डेंजरस' नाही, पण फक्त पाण्यावर अवलंबून न राहता आहार सकस ठेवा. शुद्ध पाणी प्या आणि निरोगी राहा!

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
जीवनशैली बातम्या
2nd TEST • SA vs AUS
Live
SASA
(26.3 ov)52/4
AUSAUS
-
Day 2 - Session 3
Schedule ›
5th T20 • IND vs WI
abandoned
INDIND
118/5
WIWI
-
Match abandoned
Schedule ›
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
3rd TEST • SA vs AUS
SASA
Tue, 27 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Zodiac Signs : या ४ राशींचे लोक कधीच खोटं बोलत नाहीत, खोटारड्या लोकांपासून राहतात दूर
Recommended image2
Biscuit Holes : बिस्किटांवर छोटी-छोटी छिद्रे का असतात माहितीये का?
Recommended image3
Indoor Plants : एअर प्युरिफायर घेण्यापूर्वी हे वाचा; घरातील हवा शुद्ध आणि ओलसर ठेवणारी ५ रोपे!
Recommended image4
World Osteoporosis Day : हाडांचं आरोग्य बिघडत असल्याची 5 लक्षणं, वेळीच ओळखा
Recommended image5
Instant Dosa : फक्त १० मिनिटांत बनवा कुरकुरीत डोसा, नेहमीचा डोसाही विसराल!
Related Stories
Recommended image1
Home Decor : घर दिसेल राजवाड्यासारखं! लिव्हिंग रूमसाठी 10+ कॉपर-ब्रास शोपीस
Recommended image2
Money Management : पगार होताच या 5 गोष्टी करा, महिनाअखेर खिसा कधीच रिकामा होणार नाही!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved