Money Management : पगार होताच या 5 गोष्टी करा, महिनाअखेर खिसा कधीच रिकामा होणार नाही!
Financial Tips for Salaried Employees to Manage Money Better : आजकाल अनेकांना एक मोठी समस्या भेडसावते, ती म्हणजे पैशांचं नियोजन. पगार चांगला मिळूनही महिनाअखेरीस हातात पैसे उरत नाहीत. त्यामुळे अनेक अडचणी येतात.
16

Image Credit : Getty
महिनाअखेरीस खिसा रिकामा
आजकाल अनेकांना चांगला पगार मिळूनही महिनाअखेरीस खिसा रिकामा असतो. पगार पुरत नाही, अशी तक्रार अनेकजण करतात. पण आर्थिक तज्ज्ञांच्या मते, समस्या पगारात नाही, तर तुमच्या पैशांच्या नियोजनात आहे. योग्य प्लॅनिंगचा अभाव, अनावश्यक खर्च आणि बचतीची सवय नसल्यामुळे महिनाअखेरीस पैशांची चणचण भासते. म्हणूनच, पगार जमा झाल्यावर काही महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेतले, तर पैशांचा योग्य वापर होईल आणि बचतही वाढेल. चला तर मग, त्या टिप्स कोणत्या आहेत ते पाहूया.
26
Image Credit : Getty
खर्चाची एक योजना आधीच तयार करा
पगार जमा झाल्यावर, त्या महिन्यातल्या खर्चाची एक योजना आधीच तयार करा. घरभाडं, वीजबिल, भाजीपाला, मुलांचं शिक्षण, प्रवासाचा खर्च अशा आवश्यक खर्चांची यादी बनवा. यामुळे अनावश्यक खर्च टाळता येतो. अनेकजण आधी खर्च करतात आणि उरलेले पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतात. पण तज्ज्ञांच्या मते, आधी खर्चाचं नियोजन करून मगच पैसे वापरावेत. असं केल्याने पैसे कुठे खर्च होत आहेत, याचा स्पष्ट अंदाज येतो.
36
Image Credit : Getty
रक्कम बचतीसाठी बाजूला काढणं
तज्ज्ञांच्या मते, पगार जमा झाल्यावर लगेच काही रक्कम बचतीसाठी बाजूला काढणं खूप गरजेचं आहे. अनेकजण महिनाअखेरीस उरलेले पैसे वाचवण्याचा विचार करतात, पण ही पद्धत योग्य नाही. पगार जमा होताच किमान 20 टक्के रक्कम सेव्हिंग्ज अकाऊंटमध्ये किंवा गुंतवणुकीत टाका. यामुळे भविष्यात अचानक आलेल्या आर्थिक अडचणींपासून तुम्ही स्वतःचा बचाव करू शकता, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
46
Image Credit : Asianet News
पैसे वेगाने खर्च होतात
अनेकदा छोटे-छोटे खर्चच एकत्र येऊन मोठे होतात. गरज नसताना ऑनलाइन शॉपिंग करणं, सतत बाहेर जेवणं किंवा ऑफर्सच्या मोहात पडून अनावश्यक वस्तू खरेदी करणं, या सवयींमुळे पैसे वेगाने खर्च होतात. तज्ज्ञांच्या मते, कोणताही खर्च करण्यापूर्वी 'हे खरंच गरजेचं आहे का?' हा प्रश्न स्वतःला विचारा. असं केल्याने अनावश्यक खर्च कमी होऊन पैसे वाचण्याची शक्यता वाढते.
56
Image Credit : Getty
'इमर्जन्सी फंड'
आयुष्यात कधी काय होईल, हे सांगता येत नाही. अचानक येणारा वैद्यकीय खर्च, नोकरीतील समस्या किंवा इतर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती कधीही येऊ शकते. त्यामुळे, तीन ते सहा महिन्यांच्या खर्चाएवढी रक्कम 'इमर्जन्सी फंड' म्हणून बाजूला ठेवावी, असा सल्ला आर्थिक तज्ज्ञ देतात. हा फंड भविष्यात तुम्हाला मोठ्या आर्थिक संकटांपासून वाचवतो.
66
Image Credit : Money\Twitter
छोटी रक्कमही दीर्घकाळात मोठी संपत्ती निर्माण करू शकते
फक्त बचत करून चालणार नाही, तर तुमचे पैसे वाढतील अशा ठिकाणी गुंतवणूक करणंही महत्त्वाचं आहे. तुम्ही अगदी कमी रकमेपासून गुंतवणूक सुरू करू शकता. एसआयपी (SIP), रिकरिंग डिपॉझिट (RD) किंवा इतर गुंतवणूक पर्यायांचा विचार करा. तज्ज्ञांच्या मते, छोटी रक्कमही दीर्घकाळात मोठी संपत्ती निर्माण करू शकते. विशेषतः तरुणांनी लवकर गुंतवणूक सुरू केल्यास त्यांना भविष्यात चांगली आर्थिक सुरक्षा मिळू शकते.

