सार
जगातील सर्वात लोकप्रिय आणि मोठ्या टी-20 लीग आयपीएलच्या 2024च्या हंगामाची घोषणा करण्यात आली. येत्या 48 तासात 17 व्या हंगामाच्या सामान्यांना सुरुवात होणार असून सामन्यांचे सविस्तर वेळापत्रक जाणून घ्या
नवी दिल्ली : आयपीएलच्या 17 व्या हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून सर्व संघ तयारीला लागले आहेत. 22 मार्चला आयपीएलच्या नव्या हंगामातील पहिली लढत होणार आहे. स्पर्धेतील पहिली मॅच 22 मार्च रोजी गतविजेते चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात चेन्नईत होणार आहे. बीसीसीआयने स्पर्धेच्या पहिल्या 21 दिवसांचे वेळापत्रक जाहीर केले असून यात 4 दिवस डबल हेडरच्या लढती असतील. डबल हेडरच्या दिवशी पहिली मॅच दुपारी 3:30 वाजता तर दुसरी मॅच रात्री 7:30 वाजता होणार आहे.
महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली पाच वेळा विजेतेपद मिळवणारा चेन्नईचा संघ विक्रमी सहावे विजेतेपद मिळवण्याचा यंदा तयारीत आहे. तर दुसऱ्या बाजूला डु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली आरसीबी हंगामाची सुरुवात विजयाने करण्याचा प्रयत्न करणार. शनिवारी लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली. निवडणुकीचा रणसंग्राम सुरु असताना देखील आयपीएलचा संपूर्ण हंगाम भारतात होणार आहे.बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी आयपीएल भारतातच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे तसेच 2019 साली देखील लोकसभा निवडणुकीच्या वेळी आयपीएलचे आयोजन भारतातच झाल्या होत्या असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
आयपीएल 2024 च्या पहिल्या 21 लढतींचे वेळापत्रक:
22 मार्च- चेन्नई विरुद्ध बेंगळुरू- रात्री 8 वाजता, चेन्नई.
23 मार्च- पंजाब विरुद्ध दिल्ली- दुपारी 3:30 वाजता, मोहाली
23 मार्च- कोलकाता विरुद्ध हैदराबाद- रात्री 7:30 वाजता, कोलकाता.
24 मार्च- राजस्थान विरुद्ध लखनौ-दुपारी 3:30 वाजता, जयपूर
24 मार्च- गुजरात विरुद्ध मुंबई इंडियन्स- रात्री 7:30 वाजता, अहमदाबाद
25 मार्च- बेंगळुरू विरुद्ध पंजाब- रात्री 7:30 वाजता, बेंगळुरू
26 मार्च- चेन्नई विरुद्ध गुजरात- रात्री 7:30 वाजता, चेन्नई
27 मार्च- हैदराबाद विरुद्ध मुंबई- रात्री 7:30 वाजता, हैदराबाद
28 मार्च- राजस्थान विरुद्ध दिल्ली- रात्री 7:30 वाजता, जयपूर.
29 मार्च- बेंगळुरू विरुद्ध कोलकाता- रात्री 7:30 वाजता, बेंगळुरू.
30 मार्च- लखनौ विरुद्ध पंजाब- रात्री 7:30 वाजता, लखनौ
31 मार्च- गुजरात विरुद्ध हैदराबाद- दुपारी 3:30 वाजता, अहमदाबाद.
31 मार्च- दिल्ली विरुद्ध चेन्नई- रात्री 7:30 वाजता, विशाखापट्टणम
01 एप्रिल- मुंबई विरुद्ध राजस्थान- रात्री 7:30 वाजता, मुंबई
02 एप्रिल- बेंगलुरू विरुद्ध लखनौ- रात्री 7:30 वाजता, बेंगलुरू.
03 एप्रिल- दिल्ली विरुद्ध कोलकाता- रात्री 7:30 वाजता, विशाखापट्टणम.
04 एप्रिल- गुजरात विरुद्ध पंजाब- रात्री 7:30 वाजता, अहमदाबाद.
05 एप्रिल- हैदराबाद विरुद्ध चेन्नई- रात्री 7:30 वाजता, हैदराबाद.
06 एप्रिल- राजस्थान विरुद्ध बेंगळुरू- रात्री 7:30 वाजता, जयपूर
07 एप्रिल- मुंबई विरुद्ध दिल्ली- दुपारी 3:30 वाजता, मुंबई.
07 एप्रिल- लखनौ विरुद्ध गुजरात- रात्री 7:30 वाजता, लखनौ
आणखी वाचा :
IPL 2024: IPL सामने कधी आणि कुठे दिसणार, सर्व माहिती घ्या जाणून
Lok Sabha Election 2024 : बेघर मतदारांनाही करता येणार मतदान, निवडणूक आयोगाने सांगितला सोपा पर्याय