सार

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. अशातच राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. पण देशात हजारो बेघर मतदार असून त्यांना निवडणुकीवेळी मतदान करता येत नाही.

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तारखा नुकत्याच निवडणूक आयोगाकडून (Election Commission) जाहीर करण्यात आल्या. यानंतर राजकीय पक्षांकडून लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. पण देशात अनेक बेघर मतदार (Homless Voters) आहेत, ज्यांना मतदान करण्याची संधी मिळत नाही. यावरच निवडणूक आयोगाने एक सोपा पर्याय शोधून काढला आहे. जेणेकरून बेघर मतदारांना देखील निवडणुकीत मतदान करता येईल.

कसा कराल अर्ज?
बेघर मतदारांना निवडणुकीत मतदान करण्यासाठीचे योग्य वय असावे. याशिवाय बेघर मतदारांनी फॉर्म-6 (Form-6) मध्ये सांगितलेल्या पत्त्यावर बूथ स्तरावरील अधिकारी जाऊन हे पाहतो की, व्यक्तीने दिलेल्या पत्त्यावर झोपतो की नाही. पडताळणी झाल्यानंतर बेघर व्यक्तीला निवासस्थानाच्या कागदपत्रांची आवश्यकता भासत नाही. या प्रक्रियेच्या माध्यमातून निवडणूक आयोग प्रत्येक वर्गातील, समूहातील नागरिकाने मतदान करण्यासाठी प्रोत्साहन करत आहे.

काय आहे फॉर्म-6?
फॉर्म-6 निवडणूक आयोगाकडून नव्या मतदारांच्या रजिस्ट्रेशनसाठी दिला जातो. या फॉर्मच्या माध्यमातून पहिल्यांदाच निवडणुकीसाठी मदतान करणाऱ्यांसह ज्या मतदारांनी आपला स्थानिक पत्ता बदलला आहे त्याबद्दल कळते.

बेघर मतदार अशाप्रकारे करू शकतात मतदान

ऑनलाइन रजिस्ट्रेशन
बेघर मतदारांना निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. अथवा 'Voter Helpline Mobile App’ चा वापर करून फॉर्म-6 ऑनलाइन भरता येऊ शकतो.

महत्त्वाची माहिती
फॉर्म- 6 मध्ये बेघर मतदारांना आपले नाव, वय, जन्मतारीख, जन्माचे ठिकाण, पत्ता, मोबाइल क्रमांक, इमेल आयडी अशी माहिती द्यावी लागेल.

आवश्यक कागदपत्र
बेघर मतदारांना आपले आधार कार्ड (Aadhar Card), पॅन कार्डची (PAN Card) स्कॅन केलेली प्रत ऑनलाइन अपलोड करावी लागेल.

फोटो आणि पत्त्याचा पुरावा
बेघर मतदारांनी आपला फोटो आणि पत्त्याच्या पुरावा देखील स्कॅन करून अपलोड करावा.

शेवटची स्टेप
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्र अपलोड केल्यानंतर बेघर मतदारांनी फॉर्म-6 सबमिट करायचा आहे. फॉर्म सबमिट केल्यानंतर दिलेल्या इमेलवर एक लिंक येईल. त्यावर क्लिक करून मतदान कार्डाची प्रक्रिया कुठवर आलीय हे तपासून पाहता येईल. मतदान कार्ड येण्यासाठी जवळजवळ 30 दिवसांचा कालावधी लागू शकतो.

आणखी वाचा :

Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत माहिती

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीवेळी या '4M' वर असणार निवडणूक आयोगाची करडी नजर, अशी करण्यात आलीय तयारी

Lok Sabha Election 2024 : देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार, पहिल्या टप्प्यातील निवडणूक 19 एप्रिलला