IPL 2024 सामने कधी आणि कुठे दिसणार, सर्व माहिती घ्या जाणून

| Published : Mar 20 2024, 12:56 PM IST / Updated: Mar 21 2024, 03:57 PM IST

IPL-2024-promo

सार

क्रिकेटप्रेमींना सर्वात जास्त आवडणारा वर्षातून एकदाचा येणाऱ्या आयपीएलला लवकरच सुरुवात होणार आहे. यावेळी आयपीएल भारतातच होणार असून सर्वांना त्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

क्रिकेटप्रेमींना सर्वात जास्त आवडणारा वर्षातून एकदाचा येणाऱ्या आयपीएलला लवकरच सुरुवात होणार आहे. यावेळी आयपीएल भारतातच होणार असून सर्वांना त्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. यावेळी आयपीएलचा पहिला सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात होणार आहे. हा सामना २२ मार्च २०२३ रोजी खेळवला जाणार आहे. आपण आपल्या आवडत्या आयपीएलचे सामने कुठे पाहू शकतो याबद्दलची माहिती मात्र अनेकांना नसते. 

आयपीएल २०२४ वेळापत्रक 
इंडियन प्रीमियर लीग २०२४ चे २२ मार्च ते ७ एप्रिलपर्यंतच्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या १७ दिवसांच्या वेळापत्रकात २१ सामने खेळले जाणार आहेत. यामध्ये डबल डेअर म्हणजेच शनिवार आणि रविवार दोन सामाने खेळवले जाणार आहेत. संध्याकाळचे सामाने ७:३० वाजता आणि दुपारचे सामने ३:३० वाजता खेळवले जाणार आहेत. पहिला सामना चेन्नईच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात होणार आहे, हा पहिलाच सामना असल्याने हा सामना आयपीएलच्या उद्घाटन समारंभानंतर रात्री 8:00 वाजता सुरू होईल.

आयपीएल २०२४ चे सामने कुठे आणि कधी बघायचे? 
आयपीएल २०२४ च्या सर्व सामन्यांचे जिओवर स्ट्रीमिंग केले जाणार आहे. आपण हिंदी, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांमध्ये सामने पाहू शकणार आहेत. यावेळी आपल्याला कोणत्याही सब्स्क्रिप्शनची गरज लागणार नाही. आपण सर्व सामन्यांचा मोफत आनंद घेऊ शकणार आहेत. दूरचित्रवाहिनीवर आपल्याला क्रिकेटचे सामने पाहायचे असतील तर आपण स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर पाहू शकाल. 
आणखी वाचा - 
Lok Sabha Election 2024 : सुप्रिया सुळे यांचा दौंड ते यवतपर्यंत लोकल ट्रेनने प्रवास, जाणून घेतल्या प्रवाशांच्या समस्या
Double Murder in UP : उत्तर प्रदेशातील बदाऊ येथे दुहेरी हत्याकांड, दोन मुलांची गळा चिरुन हत्या

Read more Articles on