सार
सिद्धू मुसेवालाच्या आईने बाळाला जन्म दिला आहे. त्यांनी आयव्हीएफ पद्धतीने बाळाला जन्म दिला असल्याची माहिती समजली आहे. सिद्धूचा मृत्यू होऊन दोन वर्ष झाले असून तो त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.
सिद्धू मुसेवालाच्या आईने बाळाला जन्म दिला आहे. त्यांनी आयव्हीएफ पद्धतीने बाळाला जन्म दिला असल्याची माहिती समजली आहे. सिद्धूचा मृत्यू होऊन दोन वर्ष झाले असून तो त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. सिद्धू मुसेवाल्याची हत्या त्याच्यावर पळत ठेवून करण्यात आली होती. त्या दरम्यानच्या काळात तो राजकारणात सक्रिय झाला होता.
सिद्धू मुसेवालाच्या वडिलांनी सोशल मीडियावर टाकला फोटो
सिद्धू मुसेवालाच्या आईने बाळाला जन्म दिल्यानंतर त्याच्या वडिलांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. या पोस्टमध्ये त्याचे वडील बाळाला मांडीवर घेऊन बसले होते, मागे सिद्धू मुसेवालाचा फोटो होता आणि समोरच्या टेबलवर केक ठेवला होता. या पोस्टवर सोशल मीडियावरील फॅन्सने मोठ्या प्रमाणावर लाईक आणि कमेंट केल्या होत्या.
बाळाच्या कागदपत्रांसाठी जिल्हा प्रशासनाकडून त्रास
सिद्धू मुसेवालाच्या आईला मुलगा झाल्यानंतर सरकारने आयव्हीएफ पद्धतीसाठी वयोमर्यादा निश्चित केली आहे. सिद्धूचे वडील बालकौर सिंग यांनी आरोप केला आहे की मुलाच्या कागदपत्रांसाठी जिल्हा प्रशासन त्यांचा छळ करत आहे. सरकार यावर कोणती कारवाई करते याकडे सिद्धूच्या फॅन्सचे लक्ष लागून राहिले आहे.
आणखी वाचा -
Lok Sabha Election 2024 : सुप्रिया सुळे यांचा दौंड ते यवतपर्यंत लोकल ट्रेनने प्रवास, जाणून घेतल्या प्रवाशांच्या समस्या
IPL 2024: IPL सामने कधी आणि कुठे दिसणार, सर्व माहिती घ्या जाणून