सार
Tips to lose weight after 60 : वयाच्या 60 मध्ये हेल्दी, फिट आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी वजन नियंत्रणात असणे फार गरजेचे आहे. अशातच वजन नियंत्रित ठेवण्यासाठी काय करावे हे सविस्तर जाणून घेऊया.
Tips to lose weight after 60 : वयाच्या 60 व्या वर्षी बहुतांशजणांना चालण्याफिरण्यास त्रास होऊ लागतो. वाढत्या वयासह आरोग्यासंबंधित समस्याही होऊ लागतात. अशातच सठाव्या वर्षात वजन वाढले असल्यास आरोग्यासंबंधित समस्या अधिक वाढण्याची शक्यता असते. एवढेच नव्हे या वयात वजन कमी करणेही मुश्किल असते. पण तरीही वयाच्या 60 व्या वर्षी काही टिप्स फॉलो करुन वजन कमी करू शकता.
पोषण तत्त्वयुक्त आहार
वयाच्या 60 व्या वर्षानंतर वजन कमी करायचे असल्यास केवळ कॅलरी कमी केल्याने काही होणार नाही. यावेळी पोषण तत्त्वयुक्त आहाराचे सेवन करणेही फार महत्वाचे आहे. जेणेकरुन स्नायू मजबूत राहण्यास मदत होईल. फायबरचे सेवन केल्याने पचनासंबंधित समस्या दूर राहतील. हेल्दी फॅट्सयुक्त पदार्थांमुळे मेंदूचे कार्य सुरळीत होईल. याशिवाय अत्याधिक गोड पदार्थांचे सेवन करणे टाळा. यामुळे वजन वाढले जाऊ शकते. डाएटमध्ये प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट्सयुक्त संतुलित आहाराचे सेवन करा.
प्रोटीनकडे लक्ष द्या
बहुतांशजणांना वाटते की, प्रोटीनचे सेवन केवळ मसल्ससाठी करावे. पण असे नाहीये. वयाच्या साठाव्या वर्षातही शरीराला ताकद मिळण्यासाठी प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन करणे अत्यावश्यक आहे. यामुळे स्नायू मजबूत होण्यासह भूकेवरही नियंत्रण राहते.अशातच वजन कमी करण्यास मदत होऊ शकते.
अॅक्टिव्ह लाइफस्टाइल फॉलो करा
लठ्ठपणा किंवा अत्याधिक वजनामुळे अंगात आळशीपणा आणतो. अशातच वजन कमी करायचे असल्यास अॅक्टिव्ह लाइफस्टाइल फॉलो करावी. यासाठी एखादा छंद जोपासा, मित्रपरिवाराला भेटा किंवा कोणतीही आवडीची गोष्ट करू शकता. याशिवाय दररोज थोडावेळ हलकी एक्सरसाइजही करा.
स्ट्रेंथ ट्रेनिंग करा
वाढत्या वयासह लाइफस्टाइल आणि विचार बदलू लागतात. यामुळे स्ट्रेंथ ट्रेनिंग केवळ तरुण वर्गासाठी आहे असे समजू नका. वाढत्या वयासह शरीराच्या बळकटीसाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग करणे फार महत्वाचे आहे. दररोज केवळ 20 मिनिटे स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्यास मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यास मदत होते.
हाइड्रेट रहा
प्रत्येक वयोगटातील व्यक्तींनी हाइड्रेट राहणे फार महत्वाचे आहे. यामुळे शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. पाणी प्यायल्याने आरोग्य आणि त्वचा हेल्दी राहते. पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्मलाही वेग येतो आणि भूकेवर नियंत्रण राहते.