मधुमेह असा आजार आहे, ज्यामध्ये रुग्णाला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अन्यथा रक्तातील साखर वाढून आरोग्याचे नुकसान होऊ शकते.
अत्याधिक गोड फळे जसे की, आंबे, चीकू, केळ याचे सेवन करणे टाळा. यामुळे ब्लड शुगर वाढू शकते.
मधुमेहाच्या रुग्णांनी कार्ब्सचे सेवन कमी करावे. यामध्ये गहू, बटाटे, भात किंवा कॉर्नफ्लेक्स खाऊ नये. यामुळे ब्लड शुगर वेगाने वाढतो.
मधुमेहाच्या रुग्णाने आइस्क्रिम, कोल्ड ड्रिंक्स किंवा अन्य सोडायुक्त पदार्थांचे सेवन करणे टाळावे. यामुळे ब्लड शुगर अचानक वाढू शकतो.
व्हाइट ब्रेड, पास्ता, मैद्यापासून तयार करण्यात आलेले पदार्थ, चिप्स याचे सेवन करणे टाळावे. यामुळे मधुमेहाच्या रुग्णांची समस्या अधिक वाढू शकते.
ब्लड शुगर वाढल्यास तेलकट पदार्थ खाणे टाळा. यामुळे आरोग्याला नुकसान पोहोचले जाऊ शकते.
चॉकलेट, केक, पेस्ट्री, मिठाई अशा साखरयुक्त पदार्थांचे सेवन करणे टाळावे. गोड पदार्थांमुळे मधुमेहाच्या रुग्णांच्या आरोग्याला नुकसान पोहोचले जाऊ शकते.