सार

सौंदर्य म्हणजे केवळ त्वचेची काळजी घेणं पुरेसे नाही. आपल्या केसांच्या आरोग्यावरही त्वचेचे आरोग्य अनेकदा अवलंबून असते. त्वचेइतकेच केसांची काळजी घेणेही आवश्यक आहे. प्रदूषण, धूळ यामुळे केसांचे आरोग्य बिघडते. यासाठी लिंबाचा वापर कसा करायचा जाणून घेऊया.

Hair Care Tips : आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला कळतच नाही की, तणाव आपल्या मनाची जागा कधी घेतं. तणावाचा सर्वात पहिला आणि मोठा परिणाम हा आपल्या केसांवरच होत असतो. कमी वेळ आणि सततच तणाव यामुळे केस अतिशय कोरडे होतात आणि केसांमधील पूर्ण चमक निघून जाऊन ते अतिशय खराब दिसू लागतात. यावर वेगवेगळे काही घरगुती उपाय केले जाऊ शकतात. त्यापैकीच एक उपाय म्हणजे लिंबाचा वापर. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया. 

केसांच्या आरोग्यासाठी लिंबाचा वापर 

कंडीशनर

चमचाभर लिंबाचा रस, 2 चमचे मध, 2 चमचे ऑलिव्ह ऑईल एकत्र करा. हे मिश्रण टाळूवर 30 मिनिटं लावा. त्यानंतर माईल्ड शॅम्पूने केस स्वच्छ धुवावेत. हा उपाय आठवड्यातून एकदा केल्याने केसांना त्याचा फायदा होतो.

केसगळतीवर फायदेशीर

चमचाभर लिंबाचा रस समप्रमाणात नारळाच्या तेलासोबत मिसळा. हे मिश्रण 20 मिनिटं टाळूवर लावा. त्यानंतर माईल्ड शाम्पूने केस स्वच्छ धुवावेत. आठवड्यातून दोनदा हा उपाय करा.

टाळू स्वच्छ करण्यासाठी

चमचाभर लिंबाचा रस आणि व्हिनेगर एकत्र करा. 15-20 मिनिटं केसांना आणि टाळूवर लावा. त्यानंतर माईल्ड शाम्पूने केस स्वच्छ करावेत. हा उपाय आठवडाभर केल्याने टाळू स्वच्छ राहण्यास मदत होते.

कोंडा कमी करण्यासाठी

लिंबू टाळूवर आणि केसांवर लावा. 10-15 मिनिटांनंतर माईल्ड शाम्पूने केस स्वच्छ धुवावेत. यामुळे कोंड्याचा त्रास कमी होण्यास मदत होईल.

केसांच्या वाढीसाठी

चमचाभर लिंबाचा रस आणि 2 चमचे कोरफडीचा गर एकत्र करा. केसांना आणि टाळूला नियमित हे मिश्रण लावावे. 5 मिनिटं मसाज केल्यानंतर 30 मिनिटांनी केस माईल्ड शाम्पूने स्वच्छ धुवावेत.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

लांबसडक आणि काळ्या केसांसाठी Homemade Shampoo

गालांवर गुलाबी चमक येण्यासाठी खास टिप्स, ट्राय करा बीटाचे पाणी