तुम्हाला अंडा करी आवडते का? तर ही खास रोस्टेड कोकोनट आणि मसाल्यांची पेस्ट वापरून बनवलेली अंडा करी नक्की ट्राय करा. उकडलेली अंडी आणि टोमॅटो प्युरीने बनलेली ही डिश भात, पोळी किंवा पराठ्यासोबत एकदम मस्त लागते.

ही एक चविष्ट अंडा करी रेसिपी आहे, ज्यामध्ये भाजलेले खोबरे आणि वेगवेगळ्या मसाल्यांची पेस्ट वापरली जाते. ही डिश कशी बनवायची ते पाहा.

लागणारे साहित्य

६ अंडी

ग्रेव्हीसाठी

२ चमचे खोबरेल तेल

४ लवंगा

२ वेलची

एक इंच दालचिनीचा तुकडा

१ चमचा बडीशेप

अर्धा चमचा खसखस

जावित्रीचा छोटा तुकडा

१ चमचा काळी मिरी

अर्धी वाटी किसलेले खोबरे

परतण्यासाठी

४ चमचे खोबरेल तेल

१ मोठा कांदा

चवीनुसार मीठ

२ चमचे आलं-लसूण पेस्ट

४ हिरव्या मिरच्या

अर्धा चमचा हळद

१ चमचा धने पावडर

१ चमचा लाल तिखट

टोमॅटो प्युरी (२ टोमॅटोची)

कढीपत्त्याची २ पाने

पुदिन्याची काही पाने

थोडी कोथिंबीर

कृती

अंडी उकडून त्यांची साले काढून घ्या. तेल गरम करा आणि त्यात खडे मसाले टाकून फोडणी द्या. किसलेले खोबरे आणि काळी मिरी घालून रंग बदलेपर्यंत सतत हलवत परतून घ्या. थंड झाल्यावर थोडे पाणी घालून त्याची बारीक पेस्ट करून घ्या.

थोडे तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्या. कांदा मऊ झाल्यावर आलं-लसूण पेस्ट घाला आणि कच्चा वास जाईपर्यंत परता. त्यानंतर हिरव्या मिरच्या, हळद, धने पावडर आणि लाल तिखट घालून चांगले परतून घ्या.

टोमॅटो प्युरी घाला आणि तेल सुटेपर्यंत शिजवा. पाने टाकून आणखी थोडा वेळ परता. त्यानंतर तयार केलेली मसाल्याची पेस्ट, आवश्यकतेनुसार पाणी आणि मीठ घालून चांगली उकळी येऊ द्या. अंडी टाका, पुन्हा एकदा उकळी येऊ द्या, गॅस बंद करा आणि झाकून ठेवा. तुमची चविष्ट अंडा करी तयार आहे, ती साधा भात, तूप भात, पोळी किंवा पराठ्यासोबत खाण्यासाठी तयार आहे.