MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Jeans Care Tips : रंग न जाता आणि न फाटता जीन्स वर्षानुवर्षे टिकवायचीय? या ट्रिक्स नक्की वापरा

Jeans Care Tips : रंग न जाता आणि न फाटता जीन्स वर्षानुवर्षे टिकवायचीय? या ट्रिक्स नक्की वापरा

तुमची आवडती जीन्स लवकर जुनी होतेय का? ती वारंवार धुणे टाळण्यापासून ते योग्य पद्धतीने वाळवण्यापर्यंत, जीन्स वर्षानुवर्षे नवीनसारखी टिकवून ठेवण्याच्या काही सोप्या आणि भन्नाट टिप्स…

2 Min read
Author : Karishma R
Published : Oct 03 2026, 12:24 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
जीन्सची काळजी घेणे
Image Credit : AI

जीन्सची काळजी घेणे

ऑफिस, कॉलेज किंवा मित्रांसोबतची ट्रिप असो, जीन्स ही प्रत्येकाची पहिली पसंती असते. पण आवडीने घेतलेली जीन्स काही महिन्यांतच रंग उडून जुनी दिसते. जीन्सची काळजी घेणे हे काही रॉकेट सायन्स नाही. ती धुण्याच्या आणि वाळवण्याच्या पद्धतीत थोडे बदल केले, तर ती वर्षानुवर्षे टिकते.

प्रत्येक वापरानंतर जीन्स वॉशिंग मशीनमध्ये टाकण्याची अजिबात गरज नाही. घाम, दुर्गंधी किंवा जास्त घाण असेल तरच ती पूर्ण धुवा. एरवी ती हवेशीर ठिकाणी वाळवली तरी चालते. एखादा डाग लागल्यास फक्त तोच भाग ओल्या कापडाने हलक्या हाताने पुसून काढा.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
मशीनममध्ये टाकताना जीन्स उलटी करा
Image Credit : Chat GPT

मशीनममध्ये टाकताना जीन्स उलटी करा

डाग काढण्यासाठी तुम्ही कडक ब्रशने जीन्स घासली, तर तिथला रंग नक्कीच उडेल. त्यामुळे डाग काढताना नेहमी हलक्या हातानेच काम करा. रोज एकच जीन्स वापरण्याऐवजी दुसरी जीन्स आलटून-पालटून वापरल्यास ती लवकर खराब होत नाही.

मशीनमध्ये टाकण्यापूर्वी जीन्स उलटी करणे ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे. तिची चेन आणि बटणे व्यवस्थित लावून धुतल्यास, ती इतर कपड्यांना घासून फाटणार नाही. जीन्ससोबत जड कपडे किंवा चेन असलेले इतर कपडे धुतल्यास घर्षण वाढते, हे नेहमी लक्षात ठेवा.

Related Articles

Related image1
Brighten White Clothes : पांढरे कपडे नव्यासारखे चमकवण्यासाठी सोप्या टिप्स
Related image2
Wash Sneakers In Washing Machine : वॉशिंग मशीनमध्ये शूज धुताय? मग या चुका टाळा
34
वाळवण्याची पद्धत
Image Credit : AI Image

वाळवण्याची पद्धत

गरम पाण्याऐवजी थंड पाण्याचा वापर केल्यास डेनिमचे कापड आकसणार नाही आणि रंगही जाणार नाही. जास्त डिटर्जंट किंवा कडक ब्लीच वापरणे टाळा आणि सौम्य साबणच वापरा. जीन्स जास्त वेळ पाण्यात भिजवून ठेवल्याने आणि मशीनमध्ये वेगात फिरवल्याने तिचे आयुष्य कमी होते.

नवीन जीन्सचा रंग जाऊ नये म्हणून ती व्हिनेगर किंवा मिठाच्या पाण्यात भिजवण्याची अनेकांना सवय असते. पण हा उपाय सर्वच डेनिमवर काम करेल याचा कोणताही पुरावा नाही. रंग जाण्याची शक्यता असल्यास, सुरुवातीचे काही वेळा ती हलक्या रंगाच्या कपड्यांपासून वेगळी धुवा.

वाळवण्याची पद्धतही महत्त्वाची

मशीनमधील ड्रायर जास्त उष्णता देतो, त्यामुळे जीन्ससाठी त्याचा वापर टाळा. जास्तीचे पाणी हलक्या हाताने पिळून काढा आणि जीन्स थेट उन्हात न वाळवता सावलीत हवेशीर ठिकाणी वाळवा. उन्हात वाळवल्यास काळ्या आणि गडद निळ्या रंगाची जीन्स लवकर फिकी पडते. पूर्ण वाळल्यानंतरच ती घडी करून कपाटात ठेवा. ओलसर असतानाच कपाटात ठेवल्यास तिला दुर्गंधी येऊ लागते. इस्त्री करताना जास्त उष्णता टाळा आणि लेबलवरील सूचनेनुसार योग्य तापमान ठेवा.

44
थोडीशी काळजी घेणं गरजेचं
Image Credit : chat gpt

थोडीशी काळजी घेणं गरजेचं

जीन्सच्या गुडघ्यांवर, खिशांवर आणि मांड्यांच्या भागावर जास्त झीज झाली आहे का, याकडे नेहमी लक्ष ठेवा. थोडी जरी शिलाई उसवली असेल, तर ती लगेच शिवून घ्या. यामुळे जीन्स जास्त फाटण्यापासून वाचेल. महागडे प्रॉडक्ट्स न वापरता, या छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतली, तर तुमची जीन्स दीर्घकाळ अगदी नवीनसारखीच राहील.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Aluminium Foil Medicine : गोळ्यांच्या पाठीमागे असलेलं सिल्व्हर फॉइल फक्त कव्हर नसतं, त्यामागचं खरं कारण माहितीये?
Recommended image2
Maruti Suzuki Car Sales : कार मार्केटमध्ये मारुती सुझुकीची सुसाट कामगिरी!
Recommended image3
लेझच्या पाकिटात निम्मी हवा का असते? आत हवा नाही तर...
Recommended image4
Horoscope 3rd October 2026 : प्रवासाचा बेत आखला जाऊ शकतो! पाहा तुमच्या राशीत काय दडलंय
Recommended image5
Wash Sneakers In Washing Machine : वॉशिंग मशीनमध्ये शूज धुताय? मग या चुका टाळा
Related Stories
Recommended image1
Brighten White Clothes : पांढरे कपडे नव्यासारखे चमकवण्यासाठी सोप्या टिप्स
Recommended image2
Wash Sneakers In Washing Machine : वॉशिंग मशीनमध्ये शूज धुताय? मग या चुका टाळा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved