MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Neck Pain Relief : मानदुखीशिवाय शांत झोपायचंय? योग्य उशी कशी निवडायची ते जाणून घ्या

Neck Pain Relief : मानदुखीशिवाय शांत झोपायचंय? योग्य उशी कशी निवडायची ते जाणून घ्या

मानदुखी आणि अपुऱ्या झोपेचा त्रास होतोय का? झोपण्याच्या पद्धतीनुसार योग्य उशी कशी निवडावी आणि जुनी उशी कधी बदलावी, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

2 Min read
Author : Karishma R
Published : Nov 20 2026, 01:07 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
निरोगी झोपेसाठी योग्य उशी
Image Credit : Asianet News

निरोगी झोपेसाठी योग्य उशी

उशी बनवणाऱ्या कंपन्या मऊ, कडक, मेमरी फोम आणि महागड्या उशा विकतात. पण चांगली उशी म्हणजे ती तुमच्या झोपण्याच्या पद्धतीला आणि शरीराला साजेशी असावी, असं डॉक्टर सांगतात. रात्री २ वाजता उठून उशी थोपटणं, दुमडणं किंवा थंड बाजूला वळवणं, हे अनेकांना करावं लागतं. पण खरंच 'परफेक्ट' उशी असते का? यामागचं विज्ञान काय आहे?

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
डोकं, मान आणि खांदे एका रेषेत
Image Credit : Asianet News

डोकं, मान आणि खांदे एका रेषेत

बाजारात कापसाच्या किंवा वेगवेगळ्या आकाराच्या उशा मिळतात. पण डोकं, मान आणि खांदे एका सरळ रेषेत राहायला मदत करेल, तीच उशी सर्वात उत्तम असते. कुशीवर झोपणाऱ्यांसाठी कान आणि खांद्यामध्ये अंतर असतं, त्यामुळे त्यांच्यासाठी थोडी उंच आणि कडक उशी योग्य ठरते. पाठीवर झोपणाऱ्यांसाठी मध्यम उंचीची उशी चांगली असते, ज्यामुळे हनुवटी छातीकडे ढकलली जात नाही.

पालथं झोपणाऱ्यांची मान वळलेली असते, त्यामुळे त्यांना डोकं आणि मानेला आधार देणारी चपटी उशी पुरेशी असते. सगळ्यांना एकाच उंचीची उशी चालत नाही. ज्यांचे खांदे रुंद आहेत आणि जे मऊ गादीवर झोपतात, त्यांचे खांदे गादीत रुततात, त्यामुळे त्यांना कमी उंचीची उशी लागू शकते.

Related Articles

Related image1
Tech Neck: दिवसभर लॅपटॉपवर काम करताय? मान आणि पाठदुखीचं हेच आहे मुख्य कारण
Related image2
Text Neck Syndrome : मोबाईलमुळे मान दुखतेय? 'टेक्स्ट नेक सिंड्रोम'कडे दुर्लक्ष करू नका
34
मानदुखी, घोरणं आणि उशीचं आयुष्य
Image Credit : Asianet News

मानदुखी, घोरणं आणि उशीचं आयुष्य

सकाळी उठल्यावर मान किंवा खांद्यामध्ये दुखत असेल आणि ते अर्ध्या तासात बरं होत असेल, तर तो उशीचा किंवा झोपण्याच्या चुकीच्या पद्धतीचा परिणाम असू शकतो. पण जर वेदना दिवसभर टिकून राहिल्या, वाढल्या किंवा हातात मुंग्या आल्या, तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. अनेकदा लॅपटॉपसमोर चुकीच्या पद्धतीने बसल्याचा त्रास असतो, पण लोक उशीला दोष देतात.

घोरणं थांबवण्यासाठी उशांवर उशा ठेवणं किंवा मान जास्त ताणून ठेवणं फायद्याचं नसतं. झोपेच्या समस्यांसाठी डॉक्टरांनाच भेटा. महागडी उशी नेहमीच चांगली असते, असा कोणताही पुरावा नाही. कुलिंग जेल असलेल्या उशा काही विशिष्ट गरजांसाठी उपयोगी ठरू शकतात. तुमची उशी दुमडल्यावर जर ती मूळ आकारात परत येत नसेल, तर ती खराब झालीये असं समजा. सिंथेटिक उशा १-२ वर्षं आणि मेमरी फोम उशा २-३ वर्षं टिकतात.

44
झोपेची चिंता टाळा
Image Credit : Asianet News

झोपेची चिंता टाळा

काम, सोशल मीडिया आणि वेब सिरीज यामुळे आपल्या झोपेची वेळ कमी होतेय. स्लीप ट्रॅकर्स फक्त मोजमाप करतात, त्याच्या स्कोअरच्या मागे धावल्याने 'बेड टाईम एन्झायटी' वाढू शकते. रात्री साधारण ८ तास झोपायचं ध्येय ठेवा. मध्यरात्री जाग आली तरी ५-१० मिनिटांत पुन्हा झोप लागली पाहिजे. सकाळी उठल्यावर मान न आखडता फ्रेश वाटत असेल, तर तुमची उशी अगदी योग्य काम करत आहे, हे समजून जा.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Healthy Skin : चमकदार त्वचेसाठी कोणतीही क्रीम नको, आहारात करा या 5 भाज्यांचा समावेश
Recommended image2
Winter Health : थंडी वाढताच वाढतो ब्लड प्रेशर! हार्ट अटॅक टाळायचा असेल तर या चुका करू नका
Recommended image3
Boiled Eggs : अंडं परफेक्ट उकडायला किती वेळ लागतो?
Recommended image4
Baby Anklets : लहानग्यांसाठी छोट्या पैंजण.. चिमुकल्या पावलांना किती सुंदर दिसतात!
Recommended image5
Horoscope 20th Novemeber 2026 : मेष ते मीन राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?
Related Stories
Recommended image1
Tech Neck: दिवसभर लॅपटॉपवर काम करताय? मान आणि पाठदुखीचं हेच आहे मुख्य कारण
Recommended image2
Text Neck Syndrome : मोबाईलमुळे मान दुखतेय? 'टेक्स्ट नेक सिंड्रोम'कडे दुर्लक्ष करू नका
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved