MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • अस्सल कांजीवरम साडी कशी ओखळायची? वाचा खास टिप्स

अस्सल कांजीवरम साडी कशी ओखळायची? वाचा खास टिप्स

कांजीवरम साडी ही भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध व मौल्यवान साड्यांपैकी एक मानली जाते. तमिळनाडूतील कांचीपूरममधील आहेत. या साड्या त्यांच्या समृद्ध रचनेमुळे, रेशमी पोतामुळे व झळाळत्या zari कामामुळे ओळखल्या जातात. पण साडी अस्सल कशी ओखळायची हे जाणून घेऊया. 

2 Min read
Author : Chanda Mandavkar
| Updated : Jun 20 2025, 10:49 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
रेशीम धाग्याची चाचणी
Image Credit : Social media

रेशीम धाग्याची चाचणी

खरी कांजीवरम साडी 100% खऱ्या रेशीमपासून विणलेली असते. ती तपासण्यासाठी रेशीम धागा हलक्या आगीत जाळून पाहा. जर धागा जळून केसासारखा वास आला आणि राखेत बोट लावल्यावर ती भुकटी झाली तर तो खरा रेशीम आहे. नकली रेशीम प्लास्टिकसारखा वास देतो आणि गोळ्यासारखा वळतो.

25
झरी (Zari) चाचणी
Image Credit : Social media

झरी (Zari) चाचणी

अस्सल कांजीवरम साडीतील झरी म्हणजेच साड्यांच्या कड्यांवरील आणि पल्ल्यावरच्या डिझाइनसाठी वापरलेला धागा खऱ्या चांदीचा असतो. झरी बनवताना चांदीच्या धाग्यावर सोने लावले जाते. खोटी झरी मेटॅलिक पॉलिस्टरपासून बनवलेली असते. झरीचा एक धागा वेगळा काढून त्याला खवखवत घासल्यास आतून लालसर तांबूस रंगाचा चांदीचा धागा दिसतो तर तो खरा आहे.

Related Articles

Related image1
संगीत सोहळ्यात नजर वेधून घेणारे ६ फ्रंट डीप नेक ब्लाउज डिझाईन्स
Related image2
९३ वर्षांच्या वयात पत्नीसाठी खरेदी केलं मंगळसूत्र; ज्वेलरी शॉपनं घेतले फक्त २० रुपये, व्हिडीओ पाहून मन विरघळेल
35
विणकाम आणि डिझाइन
Image Credit : social media

विणकाम आणि डिझाइन

अस्सल कांजीवरम साड्यांचे विणकाम फारच बारीक आणि सुबक असते. प्रत्येक डिझाइन हँडलूमवर विणलेले असल्यामुळे त्यात वैविध्य आणि उठाव असतो. नकली साड्यांमध्ये हे डिझाइन्स प्रिंटेड किंवा मशीनद्वारे बनवलेले असतात. त्यामुळे त्यांचा पोत सरळसरसा आणि कृत्रिम भासतो.

45
जोडीचा तपास करा
Image Credit : social media

जोडीचा तपास करा

खरी कांजीवरम साडी विणताना मुख्य भाग, कड आणि पल्लू वेगवेगळे विणले जातात आणि त्यांना एका अनोख्या तंत्राने जोडले जाते. या "कोरा" जोडीतून पल्लू हलक्या ओढण्याने सहज वेगळा होत नाही. पण नकली साड्यांमध्ये सर्व भाग एकाच रचनेतले असतात. त्यामुळे एकसंध वाटते आणि ती बनावट आहे हे लक्षात येते.

55
किंमत आणि वजन
Image Credit : social media

किंमत आणि वजन

खरी कांजीवरम साडी खूपच जडसर असते. कारण तिच्यात वापरलेले रेशीम व झरी हे घटक खूप प्रमाणात असतात. साधारणतः खरी कांजीवरम साडी 6000 ते लाखभर किंमतीपर्यंत असते. खूपच स्वस्त किंमतीत कांजीवरम साडी मिळत असेल, तर ती नकली असण्याची शक्यता अधिक असते. याशिवाय भारत सरकारने "Silk Mark" व "Handloom Mark" ही प्रमाणपत्रे खरी रेशीम आणि हँडलूम साड्यांना देण्यासाठी सुरू केली आहेत. अशी साड्या घेताना हे मार्क असलेली साडी घ्या. हे विश्वासार्हता दर्शवतात.

(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या
Recommended Stories
Recommended image1
Bathroom Deep Clean: महागड्या क्लिनरशिवाय बाथरूम करा चकचकीत, या १० टिप्सने काम होईल सोपं
Recommended image2
Zircon Earrings: जिरकॉन स्टोनच्या 5 लेटेस्ट इअररिंग डिझाइन्स; हूप्स, स्टड्स आणि टॉप्समधून निवडा बेस्ट ऑप्शन
Recommended image3
Open Kitchen Design : ओपन किचनच्या या 5 डिझाइन्स; घराला येईल क्लासी लूक
Recommended image4
Gudi Padwa 2026 : गुढीपाडव्याला कडुलिंबाची चटणी का खातात? जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि सोपी रेसिपी
Recommended image5
Summer Health Care : उन्हाळ्यात एनर्जी ड्रिंक्स पिणे ठरू शकते धोकादायक; तज्ज्ञांचा गंभीर इशारा
Related Stories
Recommended image1
संगीत सोहळ्यात नजर वेधून घेणारे ६ फ्रंट डीप नेक ब्लाउज डिझाईन्स
Recommended image2
९३ वर्षांच्या वयात पत्नीसाठी खरेदी केलं मंगळसूत्र; ज्वेलरी शॉपनं घेतले फक्त २० रुपये, व्हिडीओ पाहून मन विरघळेल
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved