सार

थंडीच्या दिवसात पायांना भेगा पडणे सामान्य बाब आहे. याची वेळीच काळजी घेण्यासह उपाय करणे महत्वाचे असते. अशातच थंडीच्या दिवसात पायांना पडणाऱ्या भेगांच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी कशा प्रकारे मॉइश्चराइजर तयार करावे याबद्दल जाणून घेऊया.

Homemade moisturizer for cracked heels : थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी होण्याची समस्या बहुतांशजणांना उद्भवते. याशिवाय सतत पाण्यात काम केल्यानेही पायांच्या तळव्यांना भेगा पडल्या जातात. यामुळे पसंतीच्या फुटवेअर घालता येत नाही. एवढेच नव्हे संपूर्ण पाय झाकलेल्या फुटवेअरमध्ये पायांच्या भेगा दुखतात. यासाठी पायांना पडलेल्या भेगांची वेळीच आणि योग्य काळजी घेणे फार महत्वाचे आहे. तुम्ही घरच्याघरी काही नैसर्गिक सामग्रीच्या मदतीने मॉइश्चराइजर तयार करू शकता. जेणेकरुन हिवाळ्यात पायांना पडणाऱ्या भेगांच्या समस्येपासून दूर राहता येईल.

पायांच्या भेगांच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी उपाय
थंडीत पायांना भेगा पडण्याची समस्या उद्भवत असल्यास आतापासूनच पायांची काळजी घेण्यास सुरुवात करा. घराबाहेर जाताना संपूर्ण पाय झाकले जातील असे फुटवेअर घाला. याशिवाय थंडीत पायांत मोजेही घाला. दररोज दोन ते तीन वेळा पायांना मॉइश्चराइजर लावा. आठवड्यातून एकदा पाय कोमट पाण्यात बुडवून ठेवल्यानंतर एक्सफोलिएट करा. यामुळे त्वचा मऊसर राहण्यासह पायांना पडणाऱ्या भेगांची समस्या दूर राहिल.

या तीन वस्तू महत्वाच्या
मॉइश्चराइजर तयार करण्यासाठी ग्लिसरीन, लिंबाचा रस आणि नाराळाचे तेल महत्वाचे आहे. या तीन वस्तूंच्या मदतीने पायांच्या भेगांवर उपाय करु शकता. याशिवाय पिवळ्या रंगातील मेण पातळ करुन त्यामध्ये नारळाचे तेल, व्हिटॅमिन ई कॅप्सून मिक्स करुन फ्रिजमध्ये ठेवा. अशाप्रकारचे मॉइश्चराइजरही पायांच्या भेगांवर काम करते.

असे तयार करा मॉइश्चराजर
एका पॅनमध्ये शिया बटर घालून वितळवून घ्या. यामध्ये नारळाचे तेल, एवोकाडो तेलही घालून मंद आचेवर गरम करा. 8-10 मिनिटांत मॉइश्चराइजर तयार होईल. एका काचेच्या बॉटलमध्ये मॉइश्चराइजर भरुन फ्रिजमध्ये ठेवा. मॉइश्चराइजरला अधिक सुवास येण्यासाठी त्यामध्ये आवडीचे एसेंशियल ऑइल मिक्स करु शकता. पायांच्या भेगांवर तयार केलेले मॉइश्चराइजर दिवसातून दोन ते तीन वेळा लावा. याशिवाय रात्रीच्या वेळेसही मॉइश्चराइजर पायांना लावल्यावर मोजे घालून झोपा.

या गोष्टींची घ्या काळजी
ज्या व्यक्तींना मधुमेह आहे त्यांना दररोज आपल्या पायांच्या तळव्यांची काळजी घ्यावी. कारण जखम झाल्यास ठिक होण्यास वेळ लागतो. याशिवाय पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थ आणि पाण्याचे सेवन करावे. यासाठी डाएटमध्ये व्हिटॅमिन सी आणि ई युक्त पदार्थांचे सेवन करा. अशाप्रकारे थंडीच्या दिवसात पायांना पडणाऱ्या भेगांच्या समस्येपासून दूर राहू शकता.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

ड्राय क्लीनशिवाय सोफ्याचे कुशन असे करा स्वच्छ, वाचा 8 DIY हॅक्स

सडपातळ कंबर हवीय? गहू नव्हे या 5 पीठाच्या पोळ्यांचे करा सेवन, वाचा Recipe