सोफ्यावर ठेवलेले कुशन त्यामध्ये माती-घाण अथवा बॅक्टेरिया कालांतराने जमा होऊ लागतात. यामुळे वेळोवेळी कुशन डीप क्लीन करणे अत्यंत गरजेचे असते.
सर्वप्रथम कुशन कव्हर काढून टाका. कव्हर वॉशिंग मशीनमध्ये माइल्ड डिटर्जेंटने स्वच्छ धुवू शकता.
कुशन हाताने किंवा वॅक्यूम क्लीनिंग करू शकता. यामुळे कुशनमधील धूळ-माती निघून जाण्यास मदत होईल.
कुशन उन्हात सुकवल्याने त्यामधील बॅक्टेरिया आणि दुर्गंधी निघून जाण्यास मदत होईल. महिन्यातून एकदा कुशन उन्हात सुकवा.
सोडियम बायकोर्बोनेट किंवा बेकिंग सोडा कुशनवर टाकून ठेवा. यानंतर वॅक्यूम क्लीनरच्या मदतीने स्वच्छ करा. यामुळे कुशनमधील ओलावा आणि दुर्गंधी निघून जाईल.
एका बाऊलमध्ये कोमट पाणी घेऊन त्यामध्ये ब्लीच मिक्स करुन स्प्रे तयार करा. यानंतर कुशनवर स्प्रे करुन 15 मिनिटांसाठी सोडून द्या. स्पंज किंवा ब्रशच्या मदतीने कुशन स्वच्छ करा.
व्हिनेगर आणि पाणी समप्रमाणात मिक्स करुन स्प्रे तयार करा. कुशनवर स्प्रे केल्यानंतर कपडाने लगेच कुशन पुसून घ्या. यामुळे कुशनवरील डाग निघून जाण्यास मदत होईल.
कुशन अधिकच मळलेले असल्यास यासाठी स्टीम क्लीनिंग करु शकता. यामुळे कुशन डीम क्लीन होण्यास मदत होते.
कुशनवर घाण, घाम अथवा तेलाचे डाग लागले असल्यास त्यावर कॉर्न स्टार्च 10 मिनिटे त्यावर टाकून स्वच्छ करा. यामुळे डाग स्वच्छ होतील.