सार

5 Types of Roti for Weight Loss : वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. अशातच व्यायामासह डाएटकडे देखील लक्ष देणे फार महत्वाचे असते. सडपातळ कंबरेसाठी गव्हाच्या नव्हे काही हेल्दी पीठांपाच्या पोळ्यांचे सेवन करा.

 

5 Types of Roti for Weight Loss : बहुतांशजणांच्या घरी दररोज गव्हापासून पोळ्या तयार केल्या जातात. पोळ्यांशिवाय संपूर्ण जेवण अपुर्ण राहिल्यासारखे वाटते. पण गव्हाच्या पोळ्यांमध्ये कार्ब्सचे प्रमाण अधिक असल्याने ग्लूटेनपासून समस्या असणाऱ्यांसाठी नुकसानदायक ठरू सकते. अशातच वजन कमी करताना काहीजण ग्लूटेन फ्री फूड्सचा पर्याय निवडतात. जाणून घेऊया अशा कोणत्या पाच प्रकारच्या पोळ्या आहेत ज्यामुळे तुम्ही हेल्दी राहता याशिवाय वजन कमी होण्यासह सडपातळ कंबरही होते. पाहा रेसिपी सविस्तर....

चण्याच्या पीठाची पोळी
सामग्री
1 कप भाजलेले चण्याचे पीठ,2 चमचे तांदळाचे पीठ, 1 चमचा तेल, चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी.

कृती
एका भांड्यामध्ये चण्याचे पीठ घेऊन त्यामध्ये तांदळाचे पीठ आणि मीठ घाला. मऊसर पीठ मळून घ्या. पीठाचे लहान आकाराचे गोळे करुन लाटून घ्या. तव्यावर पोळी दोन्ही बाजूने भाजून घ्या आणि वरुन थोडेसे तेल अथवा तूप लावून खाण्यासाठी सर्व्ह करा.

ज्वारीच्या पीठाची चपाती
सामग्री
1 कप ज्वारीचे पीठ, चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी

कृती
एका भांड्यात ज्वारीचे पीठ घेऊन मीठ घाला. पीठात कोमट गरम पाणी घालून मळून घ्या. पीठाचे लहान आकाराचे गोळे तयार करुन लाटून घ्या. गरम तव्यावर दोन्ही बाजूने व्यवस्थितीत भाजून घ्या.

बाजरीची पोळी
सामग्री
1 कप बाजरीचे पीठ, चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी

कृती
एका भांड्यात बाजरीचे पीठ घेऊन मीठ घाला. मऊसर पीठ मळून घेतल्यानंतर लहान गोळे तयार करा. पीठाचे गोळे लाटून तव्यावर दोन्ही बाजूने भाजून तूप लावा.

नाचणीची पोळी
सामग्री
1 कप नाचणी, 2 उकडलेले बटाटे, चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी

कृती
एका भांड्यात नाचणीचे पीठ, मीठ आणि उकडलेले बटाटे मिक्स करा. हळूहळू पाणी घालून मऊसर पीठ मळून घ्या. पीठाचे गोळे तयार करुन लाटून घ्या. गरम तव्यावर तूप घालून पोळी दोन्ही बाजूने भाजून घ्या.

राजगिऱ्याच्या पीठाची पोळी
1 कप राजगिऱ्याचे पीठ, 2 चमचे उकडलेले बटाटे, चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी

कृती
एका भांड्यात राजगिऱ्याचे पीठ, उकडलेले बटाटे आणि मीठ मिक्स करा. हळूहळू पाणी घालून पीठ मळून घ्या. पीठाचे लहान आकाराचे गोळे तयार करुन लाटून घ्या. गरम तव्यावर पोळी दोन्ही बाजूने व्यवस्थितीत भाजून घ्या.

वरील पाच प्रकारच्या ग्लूटेन फ्री रोटी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत. याशिवाय आरोग्य तंदुरुस्त राहण्यासही मदत करतील. एवढेच नव्हे राजगिऱ्याची पोळी उपवासावेळी नक्कीच ट्राय करू शकता.

आणखी वाचा : 

Reduce Belly Fat : पोटावरील चरबी कमी करतील ही 7 फळ, तंदुरुस्तही रहाल

साबुदाणा कशापासून तयार होतो माहितेय का?