सार

Underarm Darkness Home Remedies : अंडरआर्म्सच्या काळपटणामुळे तुम्हाला आवडीचा ड्रेस घालता येत नाही का? यामागे काही कारणे असू शकतात. यावर घरगुती उपाय काय याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

Underarm Darkness Home Remedies : काळवंडलेल्या अंडरआर्म्समुळे बहुतांशजणांना चारचौघात गेल्यानंतर लाज वाटते. उन्हाळ्यात सर्वसामान्यपणे अंडरआर्म्स काळे होण्याची समस्या अधिक वाढली जाते. अशातच आवडीचे एखादे स्लिव्हजलेस कपडे घालता येत नाहीत. खरंतर, अंडरआर्म्स काळे होण्यामागे शेविंग करणे, केमिकलयुक्त हेअर रिमूवल क्रिम अथवा साबणाचा वापर, अल्कोहोल बेस्ड डिओड्रेंट्सचा वापर करणे, क्लींजिंगकडे लक्ष न दिल्याने त्वचेवर डेड स्किन जमा होते. याच काही कारणास्तव अंडरआर्म्सच्या येथील त्वचा काळवंडली जाते.

अंडरआर्म्सचा काळेपणा दूर करण्यासाठी बहुतांशजण वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट ते महागडे प्रोडेक्ट्सचा वापर करतात. पण तुम्ही घरच्याघरी देखील काळवंडलेल्या अंडरआर्म्सची समस्या दूर करू शकता.

नारळाचे तेल
काळवंडलेल्या अंडरआर्म्सपासून दूर राहण्यासाठी नारळाच्या तेलात व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करून त्वचेवर लावू शकता. व्हिटॅमिन ई मुळे काळवंडलेल्या त्वचेची समस्या कमी होऊ शकते. याशिवाय नारळाच्या तेलामुळे त्वचेला पोषण मिळू शकते. अशातच नारळाचे तेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करुन तयार केलेली पेस्ट दररोज आंघोळीआधी एक तास लावून ठेवल्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.

लिंबाचा रस
अंडरआर्म्सच्या डार्कनेसवर घरगुती उपाय म्हणजे लिंबाच्या रसाचा वापर करावा. यामध्ये नैसर्गिक ब्लिचिंग गुणधर्म असतात. यासाठी केवळ लिंबाचा रस काळवंडलेल्या अंडरआर्म्सच्या येथे लावून ठेवत हलक्या हाताने मसाज करावा. लिंबाचा रस लावल्यानंतर मॉइश्चराइजर लावणे विसरू नका.

बेकिंग सोड्याचा वापर
बहुतांश घरामध्ये बेकिंग सोडा असतोच. अशातच अंडरआर्म्सचा काळेपणा दूर करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. यासाठी बेकिंग सोड्यामध्ये पाणी मिक्स करुन एक पेस्ट तयार करा. पेस्ट अंडरआर्म्सच्या येथे लावून ठेवल्यानंतर काळवंडलेली त्वचेची समस्या हळूहळू कमी होईल.

चंदन, गुलाब पाणी आणि हळद
अंडरआर्म्सचा काळेपणा दूर करण्यासाठी एक चमचा चंदन पावडरमध्ये गुलाब पाणी आणि चिमूटभर हळद मिक्स करुन पेस्ट तयार करून घ्या. पेस्ट अंडरआर्म्सच्या येथे 15 मिनिटांपर्यंत लावून ठेवा आणि थंड पाण्याने स्वच्छ करा. हा उपाय काळवंडलेल्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी करू शकता. याशिवाय तुमची त्वचा संवेदनशील असल्यास कोणतीही क्रिम अथवा घरगुती उपाय करण्याआधी पॅच टेस्ट करावी.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

लहान डोळ्यांसाठी असा करा मेकअप, दिसाल ब्युटीफुल

Kitchen Hacks : कैरी-पुदिन्याची चटणी तयार केल्यानंतर काळी पडते? ट्राय करा ही ट्रिक