सुकलेले तुळशीचे रोप होईल टवटवीत, घाला हे होममेड खत
Home made fertilizer for tulsi plant : उन्हाळ्याच्या दिवसात तुळशीचे रोप सुकले गेल्यास पुन्हा टवटवीत होण्यासाठी होममेड खत तयार करू शकता. यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागणार नाहीत. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊ.
14

Image Credit : Social media
तुळशीच्या रोपाची काळजी
सध्याच्या कडाक्याच्या उन्हामुळे कुंडीतील काही रोप सुकली जातात. अशातच घरातील तुळशीचे रोप सुकले गेल्यास त्याची पाने लालसर होऊ लागतात. याशिवाय रोपाची वाढ देखील खुंटली जाते. यासाठी घरगुती खत तयार करू शकता. जेणेकरुन तुळशीचे रोप पुन्हा टवटवीत होण्यास मदत होईल.
24
Image Credit : Freepik
खतासाठी सामग्री
खत तयार करण्यासाठी दही, चहापावडर आणि हळदीचा वापर करा. यामुळे तुळशीचे रोप पुन्हा टवटवीत होण्यास मदत होईल.
34
Image Credit : Freepik
असे तयार करा खत
- घरगुती खत तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका बादलीत 1 लीटर पाणी घ्या.
- पाण्यामध्ये 1 चमचा दही स्मॅश करुन घाला.
- पाण्यात 1 चमचा वापरलेली चहापावडर घाला.
- चहापावडर घातल्यानंतर चिमूटभर हळद घालून सर्व सामग्री मिक्स करा,
- हे खत 24 तास झाकून ठेवा. यानंतर तुळशीच्या रोपाला घाला.
44
Image Credit : Freepik
असा करा खताचा वापर
तुळशीचे सुकलेले रोप पुन्हा टवटवीत होण्यासाठी सर्वप्रथम रोपाजवळील थोडी माती वरखाली करुन घ्या. यानंतर मातीमध्ये घरी तयार करण्यात आलेले खत मिक्स करा. यावरुन पुन्हा माती घाला. काही दिवसानंतर पुन्हा तुळशीचे रोप टवटवीत होण्यास सुरुवात होईल.

