फरशीवर आलेले पिवळसर डाग दूर कसे करायचे असा प्रश्न बहुतांश महिलांना पडतो, अशातच वेगवेगळ्या केमिकल प्रोडक्ट्सचा वापर केला जातो. केवळ 5 रुपयांच्या एका गोष्टीने फरशी स्वच्छ होऊ शकते.
लिंबूमध्ये नॅच्युरल अॅसिड गुण असल्याने पिवळसर फरशी स्वच्छ होण्यास मदत होऊ शकते. याशिवाय फरशीवरील बॅक्टेरियाही दूर होतात.
लिंबाच्या रसाच्या मदतीने टाइल्स किंवा संगमरवरच्या वस्तू स्वच्छ करू शकता.
फरशीवर पिवळसर डाग आले असल्यास त्यासाठी लिंबू आणि मीठाचा वापर करू शकता.
लिंबाच्या रसामध्ये बेकिंग सोडा मिक्स करुन पेस्ट तयार करा. ही पेस्ट फरशीवर लावून थोड्यावेळाने स्वच्छ करा.
फरशीवरील बॅक्टेरिया आणि दुर्गंधी दूर करण्यासाठी लिंबाचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.