रंगपंचमीच्या रंगापासून अशी घ्या त्वचेची काळजी
रंगपंचमीच्या रंगांमुळे त्वचेचे नुकसान होऊ नये म्हणून त्वचेवर उत्तम ब्रँडचे मॉइश्चराइजर लावा. अधिक कोरड्या त्वचेची समस्या असल्यास नारळाच्या तेलाचाही वापर करू शकता.
रंगपंचमीच्या दिवशी चेहऱ्यासह हातापायाला सनस्क्रिन लावण्यास विसरू नका. त्वचेवर आधी मॉइश्चराइजर लावा आणि त्यावर सनस्क्रिन लावू शकता.
रंगपंचमीला केमिकलयुक्त रंगांएवजी नैसर्गिक रंगांचा वापर करा. फुलांच्या पाकळ्यांपासून तयार करण्यात आलेले रंग तुम्ही रंगपंचमीला वापरू शकता.
रंगपंचमीच्या दिवशी शॉर्ट ड्रेसएवजी फुल स्लिव्हचे कपडे परिधान करू शकता.
रंगपंचमीचा रंग घालवण्यासाठी तुम्ही त्वचेवर साबण किंवा केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर करू नका. त्याएवजी कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
रंगपंचमीआधी चेहऱ्यावरील मृत पेशी हटवण्यासाठी त्वचेला स्क्रबने एक्सफोलिएट करा. याशिवाय त्वचेसाठी हाइड्रेटिंग फेस मास्कचा वापर करू शकता.
रंगपंचमीनंतर त्वचेची काळजी घेण्यासाठी कोमट गरम पाणी किंवा केमिकल फ्री क्लिंजरचा वापर करू शकता. यानंतर चेहऱ्याला मॉइश्चराइजर किंवा कोरफडचे जेल लावू शकता.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.