सार
Heart Problem in Winter : हिवाळ्याच्या दिवसात उच्च रक्तदाब आणि रक्तातील साखर वाढली जाते. यामुळे हृदयासंबंधित आजारांचा धोका वाढला जातो. जाणून घेऊया याबद्दलच अधिक…
Health Care : हिवाळ्याच्या दिवसात आरोग्यासंबंधित काही समस्या निर्माण होतात. खासकरून हृदयासंबंधित आजार वाढले जातात. यामागे अनेक कारणे असू शकतात. हिवाळ्यात वायू प्रदूषण वाढले जाते. अशातच हवेतील धूलिकण नाकाद्वारे शरीरात गेल्याने श्वसनासंदर्भातील समस्या उद्भवू शकतात.
मधुमेह (Diabetes) आणि हायपरलिपिडेमियाची (Hyperlipidemia) समस्या असलेल्या रुग्णांनी हिवाळ्यात आरोग्याची अधिक काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. हिवाळ्यात वाढणारा हृदयविकाराच्या झटक्याचा (Heart Attack) धोका कमी करण्यासाठी नक्की काय करावे याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका वाढण्यामागील कारण
काही रिपोर्ट्सनुसार, जे लोक हृदयासंबंधित आजारांचा सामना करतात त्यांच्यामध्ये हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका 31 टक्क्यांनी वाढला जातो. रात्री झोपताना रक्तदाब आणि रक्तातील साखरेचा स्तर कमी होतो.
अशातच शरारातील ऑटोनोमिक नर्वस सिस्टम (Autonomic Nervous System) सकाळी व्यवस्थितीत काम करते. खरंतर ऑटोनोमिक नर्वस सिस्टम ही रक्तदाब आणि श्वसन दर यासारख्या शरीरातील काही प्रक्रिया नियंत्रित करते. याशिवाय हिवाळ्यात हृदयाला काम करण्यासाठी सामान्यपेक्षा जास्त मेहनत करावी लागते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
काय करावे?
हाइड्रेट राहा
तुम्ही मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाचे रुग्ण असल्यास नियमित हेल्थ चेकअप करावे. याशिवाय हाइड्रेट राहण्याचा प्रयत्न करा. यासाठी गरम पाणी अथवा हेल्दी सूप प्या.
घरीच थांबा
हिवाळ्यात वायू प्रदूषण वाढले जाते. यामुळे हृदयासंबंधित आजारांचा सामना करणाऱ्या लोकांनी हिवाळ्यात घरीच थांबावे असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. याशिवाय हिवाळ्यात श्वसनासंबंधित समस्याही निर्माण होतात. घराबाहेर पडणार असाल तर मास्क लावण्यास विसरू नका.
हेल्दी पदार्थ खा
हिवाळ्याच्या दिवसात फळ, भाज्या आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. जेणेकरून हृदयाचे आरोग्य राखले जाईल. तसेच हिवाळ्यात अधिक भूक लागत असल्यास ड्राय फ्रुट्स, ज्यूस, तीळाचे पदार्थही खाऊ शकता.याशिवाय जंक फूड खाणे टाळा.
हलका व्यायाम करा
हिवाळ्यात कोवळ्या ऊनात घराबाहेर जा. हलका व्यायाम किंवा चालण्यास जाऊ शकता. यामुळे शारीरिक हालचाल होण्यासह वजनही नियंत्रणात राहील. घराबाहेर पडता येत नसल्यास घरीच मेडिटेशन, योगा करा.
तज्ज्ञांचा सल्ला
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा:
Health : थंडीत वजन वेगाने वाढलंय? या टिप्स करा फॉलो