आठवड्याभरात 4 किलो वजन कमी करायचेय? फॉलो करा हा Diet Plan
Lifestyle Dec 13 2023
Author: Chanda Mandavkar Image Credits:Getty
Marathi
व्यायाम आणि डाएट
वजन कमी करण्यासाठी तुम्ही व्यायामासोबत डाएटही फॉलो करताय? तरीही वजन कमी होत नाहीय?
Image credits: pexels
Marathi
योग्य डाएट
वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबत योग्य डाएट फॉलो करणे अत्यावश्यक आहे. अशातच आठवड्याभरात 4 किलो वजन कमी करायचे असल्यास पुढील डाएट प्लॅन फॉलो करू शकता.
Image credits: Getty
Marathi
डिटॉक्स वॉटर
सकाळची सुरुवात तुम्ही डिटॉक्स वॉटरने करू शकता. यासाठी पुदिना आणि बडीशेप कोमट पाण्यात मिक्स करा. या डिटॉक्स वॉटरमुळे शरीरातील घाण बाहेर फेकण्यास मदत होईल व पचनक्रिया सुधारली जाईल.
Image credits: pexels
Marathi
नाश्ता
नाश्तासाठी तुम्ही दोन दुधी भोपळ्याचा पराठा, अर्धा कप दही आणि एक सफरचंद खाऊ शकता. याशिवाय ब्राउन ब्रेडचे सँडविचचाही पर्याय निवडू शकता. नाश्तानंतर एका तासांनी ग्रीन टी पिऊ शकता.
Image credits: pexels
Marathi
ताक
नाश्ता केल्यानंतर आणि दुपारच्या जेवणाआधी एक तासाचे अंतर असावे. यादरम्यान तुम्ही ताक किंवा पाणी पिऊ शकता. अथवा फळ खाऊ शकता.
Image credits: FreePik
Marathi
दुपारचे जेवण
दुपारच्या जेवणामध्ये दोन पोळी, भाजी आण डाळ अशा पदार्थांचा समावेश करावा. याशिवाय नाचणीची इडली, उपमा सारखे पर्यायही ट्राय करू शकता.
Image credits: social media
Marathi
ग्रीन टी
ग्रीन टीमध्ये अँटी-ऑक्सिडेंट असल्याने शरीरातील चयापचयाची क्रिया सुधारते. याशिवाय वजन कमी होण्यासही मदत होते. दुपारच्या जेवणानंतर व संध्याकाळी पाच वाजता ग्रीन टी चे सेवन करू शकता.
Image credits: freepik
Marathi
रात्रीचे जेवण
डाएट फॉलो करताना रात्रीचे जेवण संध्याकाळी साडेसात पर्यंत करावे. यावेळी ब्राउन राइस आणि भाज्यांचा आहारात समावेश करावा. याशिवाय भाज्यांचे सूपही पिऊ शकता.
Image credits: pexels
Marathi
तज्ज्ञांचा सल्ला
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.