MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Hair Growth Tips : केसगळतीपासून ते कोंड्यापर्यंत सर्व समस्या होतील दूर, केसांसाठी वापरा ही हिरवीगार पाने

Hair Growth Tips : केसगळतीपासून ते कोंड्यापर्यंत सर्व समस्या होतील दूर, केसांसाठी वापरा ही हिरवीगार पाने

Hair Care Tips : केसांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी आपल्या हेअर केअर रुटीनमध्ये या हिरव्यागार पानांचा समावेश करा.  

3 Min read
Author : Harshada Shirsekar
| Updated : Nov 14 2023, 01:18 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
लांबसडक केसांसाठी उपाय (LONG HAIR CARE TIPS)
Image Credit : Getty

लांबसडक केसांसाठी उपाय (LONG HAIR CARE TIPS)

Beauty Tips In Marathi : केसांशी संबंधित समस्या असतील तर सर्वजण त्यातून झटपट सुटका व्हावी, यासाठी सर्व प्रकारचे उपाय करतात. काहीजणी ब्युटी पार्लरमध्ये जाऊन महागड्या व केमिकलयुक्त ट्रीटमेंट करतात तर काही लोक घरच्या घरी नैसर्गिक उपाय करण्यावर भर देतात. पण नैसर्गिक उपाय देखील कशा पद्धतीने करायचे? याची योग्य माहिती नसल्याने केसांचे नुकसानच अधिक होते.

आयुर्वेदातील औषधी व नैसर्गिक वनस्पतींचा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य पद्धतीने वापर केल्यास केसांशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते. केसांसाठी यापैकीच एक बहुगुणी नैसर्गिक उपाय म्हणजे कढीपत्त्याची पाने. खाद्यपदार्थांची चव वाढवणारा कढीपत्ता केसांच्या आरोग्यासाठीही अतिशय लाभदायक आहे. 

या इवल्याशा पानांमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, अँटी- ऑक्सिडेंट्स, अँटी- बॅक्टेरिअल व बीटा कॅरेटीन यासारख्या पोषणतत्त्वांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ज्यामुळे केस घनदाट, लांबसडक व सुंदर होण्यास मदत मिळते. केसांच्या वाढीसाठी कढीपत्त्याच्या पानांपासून आपण कोणकोणते हेअर पॅक तयार करू शकता, जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती…

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
कढीपत्ता व नारळाचे तेल
Image Credit : Getty

कढीपत्ता व नारळाचे तेल

प्रोटीन व लोहाचा उत्तम स्त्रोत म्हणजे कढीपत्ता. हे दोन्ही घटक केसांच्या वाढीसाठी पोषक आहेत.

सामग्री : मूठभर कढीपत्त्याची पाने,  दोन ते तीन चमचे नारळाचे तेल

कसा करावा वापर?

  • एका पॅनमध्ये नारळाच्या तेलात कढीपत्त्याची पाने मिक्स करा.
  • कढीपत्त्याची पाने काळी होईपर्यंत तेल गरम करावे.
  • पाने काळी झाल्यानंतर गॅस बंद करा व तेल थंड होऊ द्यावे.
  • तेल थंड झाल्यानंतर केसांना लावा व हलक्या हाताने केसांचा मसाज करावा.
  • तासाभरानंतर सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्यावा.
  • आठवड्यातून एकदा आपण हा उपाय करू शकता.
36
कोंड्यापासून मुक्तता
Image Credit : Getty

कोंड्यापासून मुक्तता

कढीपत्त्याच्या पानात अँटी- फंगल गुणधर्म आहेत, ज्यामुळे कोरड्या केसांसह कोंड्याची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते.

सामग्री : एक चमचा कढीपत्त्याचे तेल, कापूर तेलाचे काही थेंब

कसा करावा वापर?

  • दोन्ही तेल एकत्रित मिक्स करा.
  • हे मिश्रण स्कॅल्पसह संपूर्ण केसांना लावा व मसाज करा.
  • तासाभरानंतर शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्या.
  • 15 दिवसांत एकदा हा उपाय करावा.
46
पांढऱ्या केसांच्या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी
Image Credit : Getty

पांढऱ्या केसांच्या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी

कढीपत्त्यामध्ये कित्येक औषधी गुणधर्माचा साठा आहे. ज्यामुळे केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळू शकते. यातील औषधी गुणांमुळे केसांना नैसर्गिक रंगही प्राप्त होऊ शकतो.

सामग्री : एक चमचा कढीपत्त्याचे तेल, अर्धा चमचा नारळाचे तेल

कसा करावा वापर?

  • दोन्ही तेल एकत्रित करा.
  • हे तेल मुळांसह केसांना लावा व हलक्या हाताने मसाज करा.
  • अर्ध्या तासानंतर केस स्वच्छ धुऊन घ्या.
  • हेअरवॉश करण्यापूर्वी या तेलाचा वापर आपण करू शकता.
56
कढीपत्ता व दही
Image Credit : Getty

कढीपत्ता व दही

शरीरात प्रोटीनची कमतरता निर्माण झाल्यास केसगळती व केस पातळ होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. केसगळती रोखण्यासाठी व केस मुळासकट मजबूत होण्यासाठी कढीपत्ता व दह्याचे हेअर पॅक वापरा.

सामग्री : मूठभर कढीपत्त्याची पाने, अर्धा वाटी दही

कसा करावा वापर?

  • कढीपत्त्याची पाने व दही मिक्सरमध्ये एकत्रित वाटून जाडसर पेस्ट तयार करा.
  • हेअर मास्क स्कॅल्प व सर्व केसांवर लावा. हलक्या हाताने मसाज करा.
  • 30 मिनिटांनंतर सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्या.
  • आठवड्यातून दोनदा आपण हा उपाय करू शकता.

आणखी वाचा

Hair Care : लांबसडक, मऊ व मजबूत केस हवेत? वापरा किचनमधील या साहित्यापासून तयार केलेले औषधी पाणी

केसगळती-थकव्यामुळे आहात त्रस्त? ऋजुता दिवेकरने सांगितलेल्या सुपरफुडचे कराल सेवन तर व्हाल मस्त

केसांची होईल भराभर वाढ, असे तयार करा जास्वंदाच्या फुलाचे तेल

66
तज्ज्ञांचा सल्ला
Image Credit : Getty

तज्ज्ञांचा सल्ला

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

HS
Harshada Shirsekar

Recommended Stories
Recommended image1
Navratri 2026 Fashion: जुन्या कपड्यांना द्या नवा लूक, नवरात्रीसाठी ९ भन्नाट आयडिया!
Recommended image2
Navratri 2026 Outfits : जान्हवी ते आलिया, नवरात्रीसाठी 9 बॉलिवूड अभिनेत्रींचे खास लूक्स
Recommended image3
Aluminium Foil For Plants : कुंडीतील झाडांसाठी ॲल्युमिनियम फॉइलचे ३ भन्नाट फायदे
Recommended image4
Gas Stove Low Flame : गॅस शेगडीची फ्लेम अचानक कमी झालीये? लगेच या ६ गोष्टी तपासा!
Recommended image5
Hair Care Tips : रोज हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? डॉक्टर काय सांगतात ते वाचा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved