White Hair Solution : पांढऱ्या केसांपासून हवीय मुक्तता? मग करा हे आयुर्वेदिक उपाय
- FB
- TW
- Linkdin
पांढऱ्या केसांमुळे लुक बिघडतोय?
सुंदर, घनदाट व लांबसडक केस मिळवण्यासाठी महिला कित्येक उपाय करतात. केसांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी काही महिला नैसर्गिक-आयुर्वेदिक औषधोपचार करण्यावरच भर देतात. तुम्ही देखील यांपैकीच एक आहात का? तर मग आपल्या हेअर केअर रुटीनमध्ये आवळा या फळाचा समावेश नक्की करा.
आवळ्यातील औषधी गुणधर्मामुळे गृहिणी याचा खाद्यपदार्थांमध्ये वेगवेगळ्या स्वरुपात वापर करते. यामुळे आरोग्यासह केसांशी संबंधित समस्याही दूर होण्यास मदत मिळते. म्हणून पांढऱ्या केसांपासून मुक्तता मिळवण्यासाठीही आयुर्वेदिक उपाय म्हणून आवळ्याचा उपयोग केला जातो. पांढऱ्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी कसा करावा आवळ्याचा वापर? जाणून घेऊया सविस्तर…
आवळा व मेथीचे हेअर पॅक
सामग्री : दोन चमचे आवळ्याचे तेल, दोन चमचे मेथीची पावडर
कसे तयार करावे हेअर पॅक?
सर्वप्रथम आवळ्याच्या तेलामध्ये मेथीची पावडर मिक्स करा. तयार झालेली पेस्ट केसांवर लावा. 20 मिनिटांनंतर सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्या. आठवड्यातून एकदा आपण हा उपाय करू शकता.
फायदे : आवळ्याच्या तेलामध्ये व्हिटॅमिन सी असते. ज्यामुळे अकाली पांढरे होणाऱ्या केसांची समस्या रोखण्यास मदत मिळू शकते. तर मेथीमधील अँटी-ऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्याचे कार्य करतात.
आवळा आणि ऑलिव्ह ऑइल
सामग्री : एक मोठा चमचा आवळ्याचे तेल, अर्धा चमचा ऑलिव्ह ऑइल
कसे तयार करावे तेल?
एका वाटीमध्ये दोन्ही तेल मिक्स करा. हे तेल स्कॅल्प व संपूर्ण केसावर लावा. हलक्या हाताने मसाज करावा. अर्ध्या तासानंतर सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्या. आठवड्यातून दोनदा हा उपाय करू शकता.
फायदे : आवळा तेलासोबत ऑलिव्ह ऑइलचा केसांसाठी वापर करणे फायदेशीर ठरू शकते. कारण ऑलिव्ह ऑइलमध्ये ऑलिक अॅसिड, मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड, फ्लेव्होनॉइड्स, ट्रायटरपेन्स आणि व्हिटॅमिन ई सारखे केसांसाठी आवश्यक असणारे घटक आहेत.
घरच्या घरी तयार करा आवळ्याचे तेल
सामग्री : मोठ्या आकाराचे तीन ते चार आवळे, तीन मोठे चमचे नारळाचे तेल
कसे तयार करावे तेल ?
सर्वप्रथम आवळा कापून घ्या, त्यातील बी बाहेर काढा. आवळ्याचे स्लाइस मिक्सरमध्ये वाटून त्याचा रस काढा. एका छोट्या कढईमध्ये नारळाचे तेल गरम करत ठेवा. यानंतर गॅस बंद करून तेल थोडेसे कोमट होऊ द्या. कोमट झालेल्या तेलात आवळ्याचा रस मिक्स करावा. तेल थंड झाल्यानंतर एका काचेच्या बाटलीमध्ये भरावे. आठवड्यातून दोनदा हे तेल केसांवर लावा.
फायदे : पांढऱ्या केसांच्या समस्येवर हा रामबाण उपाय आहे. रीसर्चमधील माहितीनुसार, नारळाच्या तेलात आवळ्याचा रस मिक्स करून लावल्यास पांढऱ्या केसांची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते. याव्यतिरिक्त केस मुळापासून मजबूतही होतील.
तज्ज्ञांचा सल्ला
hoDisclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.