सार

Gudi Padwa 2025 : येत्या 30 मार्चला गुढीपाडव्याचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवसापासून हिंदू नवं वर्षाला सुरुवात होते. गुढीपाडव्याचा सण आनंद, उत्साहाचा असतो. अशातच गुढीपाडव्याला कडुलिंबाची पाने आणि गुळाचे सेवन का करतात याबद्दल जाणून घेऊया.

Neem and Jaggery Chutney on Gudi Padwa : गुढीपाडव्याचा सण प्रत्येक वर्षी हिंदू नवं वर्ष म्हणजेच चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी उगाडीही साजरी केली जाते. यंदा गुढीपाडव्याचा सण 30 मार्चला साजरा केला जाणार आहे. खरंतर, गुढीपाडव्याचा सण विजयाचा पताका फडकवण्याचा मानला जातो. याशिवाय, गुढीपाडव्याला भगवान विष्णू, ब्रम्हा यांची पूजा केली जाते. गुढीपाडव्याला घराची सजावट करत दारापुढे गुढी उभारली जाते. याशिवाय रांगोळी काढली जाते. तर जाणून घेऊया गुढीपाडव्याचा सणाला कडुलिंबाची पाने आणि गुळाचे सेवन का करतात?

कडुलिंबाची पाने आणि गुळाचा प्रसाद

होळीचा सण साजरा केल्यानंतर वातावरण उष्ण होऊ लागते. यामुळे त्वचा, पोटासंबंधित समस्या आणि सर्दी-खोकल्याचा आजार होण्याची शक्यता वाढली जाते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हिंदू नवं वर्षाच्या सुरुवातीला कडुलिंबाचे सेवन केले जाते. याचवेळी कडुलिंबाची पाने आणि गुळाचे सेवन केले जाते. खरंतर, ही प्रथा फार जुनी आहे. याचे सेवन करण्यामागील कारण म्हणजे, वातावरणातील बदलामुळे आरोग्य सुदृढ रहावे.

कडुलिंबाच्या पानाचे फायदे

कडुलिंबाच्या पानांचा वेगवेगळ्या आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर केला जातो. याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. कडुलिंबाची पाने कडवट असली तरीही याचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढणे, त्वचेवरील इन्फेक्शनची समस्या दूर होणे, उच्च रक्तदाब नियंत्रणात राहणे आणि पोटासंबंधित समस्या दूर राहण्यास मदत होते.(Neem Benefits) 

गुळाचे फायदे

गुळामध्ये व्हिटॅमिन सी, बी6, झिंक आण सेलेनियम सारखी पोषण तत्त्वे असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाते. यामुळे त्वचेचे विकार, रोगप्रतिकारक शक्ती वाढणे, गॅसची समस्या दूर होणे, सर्दी-खोकल्याची फायदेशीर ठरते. (Jaggery Benefits)

अशी तयार करा कडुलिंब-गुळाची चटणी

साहित्य

5-6 कडुलिंबाची पाने, एक टिस्पून जीरे, किसलेले सुके खोबरे, चवीनुसार मीठ, गुळ, एक टिस्पून धणे, काळीमिरी.

कृती

  • सर्वप्रथम कडुलिंबाची पाने स्वच्छ धुवून घ्या. याशिवाय गुळाचे बारीक तुकडे करा.
  • मिक्सरमध्ये कडुलिंबाची पाने, गुळ, काळीमिरी, धणे, जीरे, चवीनुसार मीठ आणि सुके खोबरे घालून बारीक वाटून घ्या.