सार

Gajar Kheer Recipe : गाजराच्या हलव्याचा आस्वाद आपण अनेकदा घेतला असेलच, पण गाजराच्या खिरीची चव चाखली आहे का? जाणून घ्या गाजर खीर शॉर्ट्सची रेसिपी…

Gajar Kheer Shots Recipe : हिवाळ्यामध्ये बाजारात गाजर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. गाजर चवीला गोड तसेच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते. गाजरामध्ये व्हिटॅमिन A आणि बीटा कॅरोटीन यासारख्या पोषकतत्त्वांचा समावेश आहे. 

हिवाळ्यामध्ये प्रत्येक घराघरांत गाजर हलवा तयार केला जातोच. पण तुम्ही कधी गाजराच्या खिरीची चव चाखून पाहिलीय का? नाही म्हणता, चला तर जाणून जाणून घेऊया गाजर खीर शॉट्सची सोपी रेसिपी...

सामग्री

  • दूध - दीड लिटर full cream milk)
  • भिजवलेले तांदूळ - चार चमचे
  • किसलेले गाजर - 150 ग्रॅम
  • वेलची पावडर - आवश्यकतेनुसार
  • साखर - पाच ते सहा चमचे
  • सुकामेव्याचे काप

पाककृती

  • गॅसवर एक पॅन गरम करत ठेवा. यानंतर पॅनमध्ये दूध गरम करत ठेवा.
  • दूध चमच्याने ढवळत राहा. दूध गरम झाल्यानंतर त्यामध्ये भिजवलेले तांदूळ मिक्स करा.
  • दूध व तांदूळ पॅनला चिकटू नये, यासाठी मिश्रण ढवळत राहा.
  • तांदूळ शिजेपर्यंत मंद आचेवर दूध उकळू द्यावे.
  • तांदूळ शिजल्यानंतर त्यामध्ये किसलेले गाजर मिक्स करा.
  • यानंतर वेलची पावडरही मिक्स करावी.
  • आता संपूर्ण मिश्रण एकजीव होईपर्यंत ढवळत राहा.
  • खीर घट्ट होईपर्यंत मिश्रण शिजू द्यावे.
  • सर्व मिश्रण शिजल्यानंतर साखर मिक्स करावी.
  • साखर विरघळेपर्यंत मिश्रण ढवळा आणि यानंतर सुकामेव्याचे काप मिक्स करा.
  • खीर तयार झाल्यानंतर गॅस बंद करा.
  • सजावटीसाठी सुकामेव्याचे काप वापरा आणि गरमागरम खीर सर्व्ह करा.
  • तुम्हाला थंड खिरीचा आस्वाद घेणे आवडत असेल तर फ्रीजमध्ये ठेवा.
  • यानंतर शॉर्ट्स ग्लासमध्ये खीर सर्व्ह करा.
  • आपल्या कुटुंबीयांसोबत गाजराच्या खिरीचा आस्वाद घ्या.
View post on Instagram
 

आणखी वाचा :

खमंग मटार कचोरी, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप रेसिपी

गाजर हलव्यामध्ये दूध मिक्स करताना करू नका ही चूक, अन्यथा बिघडेल चव

Saat Kappyache Ghavane : सात कप्प्यांचे घावणे, जाणून घ्या कोकणातील पारंपरिक रेसिपी