- Home
- lifestyle
- Pressure Cooker Tips : प्रेशर कुकरमध्ये हे पदार्थ चुकूनही शिजवू नका, आरोग्याला होईल नुकसान
Pressure Cooker Tips : प्रेशर कुकरमध्ये हे पदार्थ चुकूनही शिजवू नका, आरोग्याला होईल नुकसान
स्वयंपाक लवकर व्हावा म्हणून अनेक जण प्रेशर कुकरचा वापर करतात. काही लोक तर सगळेच पदार्थ कुकरमध्ये शिजवतात. पण काही विशिष्ट पदार्थ कुकरमध्ये शिजवणे आरोग्यासाठी आणि सुरक्षेसाठी अजिबात चांगले नसते.

पास्ता आणि मॅकरोनी
पास्ता आणि मॅकरोनी
अनेक जण वेळ वाचवण्यासाठी पास्ता किंवा मॅकरोनी कुकरमध्ये शिजवतात. कुकरमध्ये शिजवल्याने ते खूप मऊ होतात. यातील स्टार्चमुळे फेस तयार होतो आणि कुकरचा व्हॉल्व्ह ब्लॉक होण्याचा धोका असतो. त्यामुळे पास्ता नेहमी वेगळ्या पातेल्यात पाणी उकळून शिजवावा.
भात
प्रेशर कुकरमध्ये भात शिजवणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. पण कुकरमध्ये भात शिजवणे आरोग्यासाठी चांगले नसते. पातेल्यात भात शिजवून त्याची पेज काढल्याने अतिरिक्त स्टार्च निघून जातो. कुकरमध्ये भात शिजवल्यास तो खूप चिकट आणि लगदा होतो.

दुधाचे पदार्थ आणि पालेभाज्या
दुधाचे पदार्थ
अनेक जण दूध उकळणे किंवा खीर बनवणे यासारखी कामे कुकरमध्ये करतात. पण हे पदार्थ शिजवताना खूप काळजी घ्यावी लागते. दूध उतू जाऊन कुकरचा व्हॉल्व्ह किंवा शिट्टीमध्ये अडकू शकते. यामुळे प्रेशर बाहेर न आल्याने मोठा अपघात होऊ शकतो. असे पदार्थ नेहमी जाड बुडाच्या पातेल्यातच बनवावेत.
पालेभाज्या
पालेभाज्या आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. पण पालक, मेथी यांसारख्या पालेभाज्या कुकरमध्ये शिजवणे चुकीचे आहे. जास्त तापमानावर शिजवल्याने त्यांचा रंग आणि चव बदलते. तसेच त्यातील पोषक घटकही नष्ट होतात. त्यामुळे पालेभाज्या नेहमी कमी वेळात शिजवाव्यात किंवा परतून घ्याव्यात.
टोमॅटो आणि आंबट पदार्थ
टोमॅटो आणि आंबट पदार्थ
प्रेशर कुकरमध्ये टोमॅटो, चिंच यांसारखे आंबट पदार्थ शिजवू नयेत. ॲल्युमिनियमच्या कुकरमध्ये हे पदार्थ जास्त वेळ शिजवल्यास, धातू आणि आंबट पदार्थ यांची रिॲक्शन होण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा पदार्थांसाठी नेहमी स्टेनलेस स्टील किंवा इतर धातूची भांडी वापरावीत.

