उत्तम चवीसाठी खाली दिलेल्या टिप्स नक्की फॉलो करा.
कोणतीही पूर्वतयारी न करता स्वयंपाक करू नका. तयारी नसेल तर गॅस वारंवार चालू-बंद करावा लागतो. याचा थेट परिणाम अन्न शिजण्यावर होतो.
काही लोक वेळ वाचवण्यासाठी मोठ्या आचेवर जेवण बनवतात. यामुळे जेवणाची चव बिघडते. नेहमी मंद किंवा मध्यम आचेवरच अन्न शिजवावे.
स्वयंपाकात मीठ सर्वात महत्त्वाचे असते. ते कमी-जास्त झाले तर चव पूर्णपणे बदलते. तसेच, मसाल्यांचा वापर आणि त्यांच्या चवीचा अंदाज असणे गरजेचे आहे.
कोणताही पदार्थ बनवताना ताज्या भाज्यांना प्राधान्य द्या. यामुळे जेवणाची चव वाढते. तसेच, वापरले जाणारे सर्व साहित्य ताजे असावे.
प्रत्येक पदार्थ शिजण्यासाठी ठराविक वेळ लागतो. त्यामुळे शांतपणे आणि संयमाने स्वयंपाक केल्यासच जेवण चविष्ट बनते.
Olive Oil Health Benefits : ऑलिव्ह ऑईल खाण्याचे 6 जबरदस्त फायदे
Dandruff Home Remedies : कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी 6 घरगुती उपाय
Rani Haar : गळाभर राणी हार... लग्नसराईत रॉयल लूकसाठी हे डिझाईन्स नक्की ट्राय करा
Mouth Ulcers : तोंडातील अल्सरने हैराण आहात? हे घरगुती उपाय नक्की करून पाहा