Food : काळ्या लसणाबद्दल कधी ऐकलंय का? पांढऱ्या लसणाच्या तुुलनेत काय आहे वेगळेपण?
Food : लसूण पदार्थाचा स्वाद वाढवतो. लसूण पांढरा असतो हे वेगळं सांगायला नको. पण काळा लसूणही असतो, हे तुमच्यापैकी किती जणांना माहीत आहे? नक्की काय आहे हा काळा लसूण? याचे काय गुणधर्म अन् विशेष फायदे आहेत? चला जाणून घेऊया.

काळा लसूण कसा तयार होतो?
काळा लसूण हा लसणाचा नवीन प्रकार नाही. आपण वापरत असलेला साधा लसूणच काही आठवडे नियंत्रित तापमान आणि आर्द्रतेमध्ये ठेवला जातो. या प्रक्रियेमुळे लसूण काळा होतो आणि त्याचा उग्रपणा कमी होऊन गोड चव येते.
दोघांमध्ये काय फरक आहे?
सामान्य लसणात 'ॲलिसिन' असते, ज्यामुळे पचनाचा त्रास होऊ शकतो. काळ्या लसणात ॲलिसिनचे रूपांतर अँटीऑक्सिडंट्समध्ये होते. 'एस-एलिल सिस्टीन' नावाचा पदार्थ शरीरात सहज शोषला जातो.
पचनाची समस्या असणाऱ्यांसाठी...
ज्यांना पांढरा लसूण चालत होत नाही, त्यांच्यासाठी काळा लसूण चांगला पर्याय आहे. तो कमी तिखट असल्यामुळे पोटासाठी सौम्य असतो. अपचनाची समस्या असलेल्यांना तज्ज्ञ हा पर्याय सुचवतात.
काळ्या लसणाचे फायदे
काळ्या लसणात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. तो रोगप्रतिकारशक्ती वाढवतो, हृदयाचे आरोग्य सुधारतो आणि यकृताचे संरक्षण करतो. दिवसातून एक किंवा दोन पाकळ्या खाणे फायदेशीर ठरू शकते.
हितकारक आहे, पण...
काळा लसूण फायदेशीर आहे, पण तो औषधी नाही. संतुलित आहार महत्त्वाचा आहे. रक्त पातळ करणारी औषधे घेणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
टीप : ही माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. डॉक्टरांचा सल्ला घ्या.

