सार

तंदुरुस्त आणि हेल्दी राहण्यासाठी बहुतांशजण वेगवेगळ्या प्रकारचे डाएट आणि वर्कआउट फॉलो करतात. याशिवाय काहीजण चालल्यानेही वजन कमी होते असे मानतात. अशातच दररोज दहा हजार नव्हे केवळ अडीच हजार स्टेप्स चालूनही फिट राहू शकता.

2500 Steps Benefits : वजन कमी करायचे असो किंवा हाय बीपी नियंत्रणात ठेवायचा असल्यास चालणे ही एक उत्तम एक्सरसाइज मानली जाते. दरम्यान, वजन कमी करण्यासाठी दररोज 10 हजार स्टेप्स चालण्याचा सल्ला दिला जातो. पण काहींना पूर्ण 10 हजार स्टेप्स चालणे शक्य होत नाही. यामागे काही कारणेही असू शकतात. पण तुम्ही केवळ अडीच हजार स्टेप्स चालूनही हृदयासंबंधित समस्या कमी करू शकता. काही संशोधनातून असे समोर आले आहे की, दररोज अडीच हजार स्टेप्स चालल्याने शरीर फिट राहण्यासह हेल्दीही राहते.

काय म्हणतो अभ्यास?
अभ्यासातून असे समोर आले आहे की, आरोग्य तंदुरुस्त राहण्याची सुरुवात 2600 ते 2700 स्टेप्स चालल्यापासून होते. हृदयाच्या आरोग्यासाठी 2600 स्टेप्स पुरेशा असल्याचे मानले जाते. यामुळे मृत्यूदर जवळजवळ 8 टक्क्यांपर्यंत कमी होतो. दरम्यान, दररोज 9 हजार स्टेप्स चालल्याने लवकर मृत्यू ओढावण्याची शक्यता 60 टक्क्यांनी कमी होते. याशिवाय 7 हजार स्टेप्स चालणाऱ्यांमध्ये हृदयासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता 51 टक्के कमी होऊ शकते.

अडीच हजार स्टेप्स चालण्याचे फायदे

रोगप्रतिकारक शक्ती वाढते
वजन कमी करण्यासह हेल्दी राहण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे महत्वाचे असते. यासाठी उत्तम डाएट आणि दररोज अर्धा तास चालावे असे सांगितले जाते. तुम्ही दररोज 10 हजार स्टेप्स चालू शकत नसल्यास केवळ अडीच हजार स्टेप्सच्या माध्यमातूनही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. यामुळे संसर्गजन्य आजारांपासून दूर राहता.

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत थोडावेळ चालल्यानेही हृदयाचे आरोग्य राखले जाते. ज्या व्यक्ती नियमितपणे अडीच हजार किंवा त्याहून अधिक स्टेप्स चालतात त्यांच्यामध्ये हृदयासंबंधित आजारांचा धोका कमी उद्भवला जातो. याशिवाय शरिरातील रक्तपुरवठाही व्यवस्थितीत होते.

मधुमेह नियंत्रणात राहतो
मधुमेह असलेल्या व्यक्तींनी दररोज अडीच हजार स्टेप्स चालल्याही फायदा होऊ शकते. नियमितपणे अर्धा तास चालल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहू शकते.

उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत
उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवायचा असल्यास चालणे हा फायदेशीर मार्ग ठरू शकतो. आरोग्य तज्ज्ञांनुसार, उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी नियमित अर्धा तास चालावे. यामुळे ब्लड सर्कुलेशन सुधारण्यासह तणावही कमी होण्यास मदत होते.

आणखी वाचा : 

कडुलिंबाचे अनेक आरोग्यदायी फायदे, मात्र 'या' रोगावर ठरते रामबाण उपाय!

12 तास ओठांवर टिकून राहिल लिपस्टिक, लक्षात ठेवा या 5 खास ट्रिक