सार
Navaratri Recipe 2024 : यंदा शारदीय नवरात्रौत्सवाला 3 ऑक्टोंबरपासून सुरुवात होणार आहे. या नऊ दिवसात बहुतांशजण उपवास करतात. अशातच उपवासासाठी फराळी मिसळ तयार करू शकता. पाहा रेसिपी स्टेप बाय स्टेप सविस्तर…
Navaratri Recipe 2024 Farali Misal : प्रत्येक वर्षी अश्विन शुल्क पक्षाला नवरात्रौत्सव साजरा केला जातो. यंदा शारदीय नवरात्रौत्सव 3 ऑक्टोंबरपासून ते 11 ऑक्टोंबरपर्यंत साजरी केली जाणार आहे. या काळात बहुतांशजण उपवास करतात. अशातच उपवासावेळी झटपट तयार होणारी एखादी रेसिपी करण्याचा विचार करत असल्यास फराळी मिसळ ट्राय करू शकता. पाहूया फराळी मिसळसाठी लागणारी सामग्री आणि कृती सविस्तर…
सामग्री :
- वरईचा भात
- फराळी चिवडा
- उकडलेले बटाटे
- दही
- मिरची
- जीरे
- साबुदाण्याचा चिवडा
- तळलेले शेंगदाणे
- काकडी
- मीठ
- साखर
- लिंबू
- कोथिंबीर
शेंगदाणा आमटी कृती
शेंगदाण्याची आमटी तयार करण्यासाठी भाजलेले शेंगदाणे, हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. यानंतर कढईत तूप घालून जीरे फोडणीसाठी द्या. यामध्ये शेंगदाण्याचे मिश्रण, चवीनुसार मीठ आणि साखर घालून सर्व सामग्री व्यवस्थितीत एकजीव करा. शेंगदाण्याच्या आमटीमध्ये गरजेनुसार पाणी घालून 5 मिनिटे उकळवून घ्या.
मिळसाठी कृती
सर्वप्रथम एका बाऊलमध्ये फराळी चिवडा घ्या. यामध्ये गरज असल्यास वरईचा भातही मिक्स करू शकता. आता मिसळमध्ये उकडलेला बटाटा, तळलेले शेंगदाणे, काकडी, मिरची,दही, चवीनुसार मीठ आणि साखर घालून घ्या. यावरुन जीऱ्याची फोडणी द्या. मिसळ तयार झाल्यानंतर त्यावरुन शेंगदाण्याची आमटी घालून कोथिंबरही घाला. अशाप्रकारे नवरात्रौत्सवावेळी झणझणीत आणि सोपी अशी फराळी मिसळची रेसिपी तयार होईल.
VIDEO : उपवासासाठी फराळी मिसळ करण्यासाठी पाहा संपूर्ण व्हिडीओ
आणखी वाचा :
नवरात्रौत्सवाला Sonalee Kulkarni सारख्या नेसा या 9 साड्या, दिसाल सुंदर